Sandeep Nahar Dies By Suicide: धोनी चित्रपटातील आणखी एका अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या; संदीप नाहर याच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूतून आता कुठे सर्व जण सावरले असताना आता बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूतून आता कुठे सर्व जण सावरले असताना आता बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप नाहर (Sandeep Nahar) याने मुंबईतील गोरेगाव येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संदीप नाहरच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का लागला आहे.  संदीप नाहरची एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. ज्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. या पोस्टचाही पोलीस तपास करत आहेत.

नुकतीच संदीप नाहरने फेसबूकवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्याने म्हटले आहे की, "मी आयुष्यात खूप सुख-दुख पाहिले. समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येचा सामना केला. मात्र, सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे, मला ते सहन होत नाही. आत्महत्या करणे योग्य नाही, हे मलाही ठाऊक आहे. पण माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिच्या वडिलांनी मला कधीच संमजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला जगायचे होते. परंतु, जिथे सेल्फ रेस्पेक्ट नाही, तिथे जगून काय फायदा! माझी पत्नी खूप रागिष्ट आहे. तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. दररोज क्लेश सहन करण्याची शक्ती आता माझ्यात नाही" असे संदीपने पोस्टमध्ये म्हटले आहे. हे देखील वाचा- Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या

संदीप नाहरची फेसबूक पोस्ट-

तसेच "माझ्या आयुष्यात मी अनेक अडचणी पाहिल्या. मी कित्येक वर्षांपासून मुंबईत आहे. मी वाईट वेळही पाहिली पण कधीच खचलो नाही. स्ट्रगल करत होतो, पण समाधानी होतो. आज मी खूप काही मिळवले आहे. पण मला लग्नानंतर समाधान नाही. माझे गेल्या दोन वर्षात संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. या गोष्टी मी कोणालाच सांगू शकत नाही. मी खूप आधीच आत्महत्या केली असते. पण मी स्वत:ला वेळ देण्याचे ठरवले. सर्वकाही ठिक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केले. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदाने उचलावे लागेल", असे म्हणत संदीप नाहरने आत्महत्या केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now