Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत च्या निधनानंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यासह 'या नेत्यांनी व्यक्त केला खेद (पहा ट्विट)

तर दुसरीकडे शिवसेना खासदर संजय राऊत यांनी आपल्या अंदाजात एक शायरी सहित सुशांतचा फोटो पोस्ट करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Sachin Tendulkar/Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मानसिक नैराश्यातून सुशांत याने हे पाऊल उचलल्याचे शक्यता असून वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला असून आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हे धक्कादायक वृत्त समोर येताच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सुद्धा सुशांतच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना केली आहे,या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असून एक हरहुन्नरी कलाकाराला बॉलिवूड फार लवकर मुकला आहे अशा भावना सुद्धा या ट्विट मधून मांडण्यात आल्या आहेत. Sushant Singh Rajput Commit Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ही' होती शेवटची पोस्ट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयातर्फे उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुशांत सिंह राजपूत याला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदर संजय राऊत यांनी आपल्या अंदाजात एक शायरी सहित सुशांतचा फोटो पोस्ट करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.  अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना

CMO महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस

संजय राऊत

जयंत पाटील

अनिल देशमुख

अनिल परब

सुप्रिया सुळे

रावसाहेब पाटील दानवे

श्रद्धा कपूर सह सुशांत सिंह राजपूत 'छिछोरे' या शेवटच्या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पवित्र रिश्ता आणि किस देश में है मेरा दिल या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती