Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी
यानंतर सुशांत सिंह राजपूत याने हिंदी सिनेसृष्टीतल्या कंपूशाहीमुळे आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Death Case) गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर सुशांत सिंह राजपूत याने हिंदी सिनेसृष्टीतल्या कंपूशाहीमुळे आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला होता. तसेच या संदर्भातल्या काही बातम्याही समोर आल्या होत्या. यातच सुशांतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असा अहवाल दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला (CBI) सोपवला आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अहवाल चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजिक करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवालाची प्रतीक्षा करत आहे. आम्हाला यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही." पुढील माहिती मिळेपर्यंत यावर भाष्य करणे उचित नाही. ज्यावेळी आम्हाला अधिकृत माहिती मिळेल तेव्हाच आम्ही या प्रकरणावर भाष्य करु. आम्हाला याप्रकरणातील चौकशी अहवाल लोकांसमोर आणवा, अशी इच्छा आहे. ज्यामुळे सुशांतची हत्या होते की आत्महत्या? हे सर्वांनाच कळेल, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Bollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 14 जून रोजी आपल्या मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. परंतु, सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमा आणि सुशांतच्या कुटुंबियांचे दावे यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र, अद्यापही सुशांतच्या आत्महत्येचे कारण लोकांसमोर आलेले नाही.