Sunny Leone Dance in Marathi Mulgi Look: अगं बाई! सनी लियोन हिचा मराठमोळ्या अवतारात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाला (Video)

सनीवर चित्रीत झालेले गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे.

Sunny Leone | (Photo Credit: Instagram)

'द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव' (The Battle of Bhima Koregaon) चित्रपटातून अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) प्रे्क्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सनी लियोन मराठमोळ्या पोषाखात (Sunny Leone in Marathi Mulgi Look) दिसते आहे. सनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूवर्स मिळाले आहेत. होय, या चित्रपटात सनी मराठी मुलगी (Marathi Mulgi)) म्हणून सादर होताना दिसते आहे. या व्हिडिओतील सनीच्या अदा आणि डान्स याची जोरदार चर्चा तर होती आहेच. परंतू, सनीचे कौतुकही होते आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना सनीने 'हो आली रे आली...मराठी मुलगी आली' असे कॅप्शनही दिले आहे.

अभिनेत्री सनी लियोन ही नेहमीच सोशल मीडियावर कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. सनी आपल्या विविध कार्यक्रम, सेलिब्रेशनचे व्हिडिओ चित्रित करते आणि त्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर्स करते. या फटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाखो, करोडो लाईक्स येतात आणि शेअर्सही तितकेच मिळतात. आताही सनीने सेअर केलेल्या 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव' (The Battle of Bhima Koregaon) चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ अनेकांनी आवडल्याचे म्हटले आहे. सनीवर चित्रीत झालेले गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे. या चित्रपटात सनीसोबत अर्जुन रामपाल, दिगंगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक हेसुद्धा दिसणार आहेत. (हेही वाचा, Sunny Leone Birthday Special: बेबी डॉल ते कुठं कुठं जायचं हनिमूनला सहित 'या' गाण्यांमध्ये सनी लियोनी च्या अदा पाहून प्रेक्षक झाले होते फिदा (Watch Video))

सनी लियोन डान्स व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

दरम्यान, सनी लियोन 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव' (The Battle of Bhima Koregaon) चित्रपटासोबतच आपल्या आगामी अपकमिंग हॉरर कॉमेडी फिल्म 'कोका कोला', 'रंगीला' आणि 'वीरमादेवी' आदींमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री सनी लियॉन सुरुवातीपासूनच प्रसिद्ध आहे. परंतू ती प्रसिद्धी काहीशी वेगळी होती. शो 'बिग बॉस' या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सनी लियॉन हिने प्रवेश केला आणि ती एकदम अधिक ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात आली. या आधी सनी लियोन हिचे अनेक चित्रपट आले आहेत. खास करुन या चित्रपटात सनीवर चित्रीत झालेली गाणी खास गाजली. यात 'बेबी डॉल' ते 'लैला' आदी गाण्यांचा समावेश आहे.