कॅन्सरग्रस्त सोनाली बेंद्रे झाली भावूक ; लग्नाच्या वाढदिवासानिमित्त पतीसाठी लिहिला खास संदेश
लग्नाच्या 16 व्या वाढदिवसानिमित्त कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनाली बेंद्रेने पती गोल्डी बहलसाठी एक भावनिक संदेश लिहिला.
लग्नाच्या 16 व्या वाढदिवसानिमित्त कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनाली बेंद्रेने पती गोल्डी बहलसाठी एक भावनिक संदेश लिहिला. तिने इंस्टाग्रामवर गोल्डीसोबतचे काही फोटोज शेअर करत आपल्या भावनांना वाट करुन दिली. यात सोनाली-गोल्डीच्या लग्नाचा फोटोही पाहायला मिळत आहे.
या पोस्टमध्ये सोनाली बेंद्रेने लिहिले की, "हे पत्र लिहायला घेतल्यावरच मला समजले की, "मी माझ्या भावना, विचार शब्दात व्यक्त करु शकणार नाही. पती, साथीदार, बेस्ट फ्रेंड, माय रॉक.... माझ्यासाठी हे सर्व आहे गोल्डी बहल. लग्न म्हणजे एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणे आणि फक्त देवालाच माहित आहे की, आम्ही या वर्षी कठीण प्रसंगांचा सामना कसा केला आहे."
सोनाली पुढे लिहिते की, "कॅन्सरसारखे युद्ध एकट्याने लढले जात नाही. ही लढाई संपूर्ण कुटुंबाला लढावी लागते."
त्यानंतर आपल्या पतीचे आभार मानत सोनालीने लिहिले, "माझ्या ताकद, प्रेम आणि आनंदाचा स्त्रोत झाल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासोबत प्रत्येक प्रसंगात उभा राहिल्याबद्दल धन्यवाद. फक्त आभार मानून आपल्या भावना व्यक्त करु शकणार नाही."
काही दिवसांपूर्वी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर शेअर केले होते. सोनालीने आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. सोनाली न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असल्याने यंदा सोनालीचे दिवाळी सेलिब्रेशन न्यूयॉर्कमध्ये होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2018 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

