Singham Again Title Track: 'सिंघम अगेन'चा टायटल ट्रॅक रिलीज, अजय देवगणसोबत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही झळकले
'सिंघम अगेन' 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार असून, या टायटल ट्रॅकने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. रोहित शेट्टीच्या या मोस्ट अवेटेड चित्रपटात भरपूर ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.
Singham Again Title Track: चाहत्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर 'सिंघम अगेन'चा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. या गाण्यात दिसत आहे आणि त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील त्यांच्या खास भूमिकेत दिसत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटातील हे गाणे ॲक्शन आणि एनर्जीने परिपूर्ण आहे, ज्यामध्ये सर्व कलाकार आपापल्या भूमिकेला जीवदान देताना दिसत आहेत. (हेही वाचा - Singham Again Song Jai Bajrangbali: अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटातील 'जय बजरंगबली' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला )
या गाण्याचा व्हिडीओ चाहत्यांना रोमांचित करणारा तर आहेच, पण प्रेक्षकांना चित्रपटाच्या धमाकेदार अनुभवाचीही झलक देत आहे. अजय देवगणच्या सिंघम या व्यक्तिरेखेचा उत्साह आणि उत्कटता दर्शवणारा हा टायटल ट्रॅक चित्रपटाच्या ॲक्शन-पॅक्ड सिक्वेलची झलक देतो. दीपिकाचा दमदार लूक, रणवीरची एनर्जी, अक्षयचा स्वॅग आणि टायगरची शानदार एन्ट्री या गाण्यात नवसंजीवनी देत आहे.
पाहा व्हिडिओ -
'सिंघम अगेन' 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार असून, या टायटल ट्रॅकने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. रोहित शेट्टीच्या या मोस्ट अवेटेड चित्रपटात भरपूर ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)