IPL Auction 2025 Live

Attack on Singer Sonu Nigam: गायक सोनू निगम याला मारहाण, मुंबईतील चेंबूर परिसरात आयोजित संगीत कार्यक्रमादरम्यानची घटना (Watch Video)

या घटनेत गायक सोनू निगम यास मुक्कामार (Singer Sonu Nigam Assaulted) लागला आणि किरकोळ दुखापत झाली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Sonu Nigam | (Photo Credits: Twitter)

गायक सोनू निगम (Attack on Singer Sonu Nigam) आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना चेंबूर (Chembur ) येथे एका कार्यक्रमादरम्यान सोमवारी (21 फेब्रुवारी) धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत गायक सोनू निगम यास मुक्कामार (Singer Sonu Nigam Assaulted) लागला आणि किरकोळ दुखापत झाली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. चेबूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, गुन्हाही दाखल केलाआहे. हा प्रकार एका संगीत कार्यक्रमात सेल्फी घेण्यावरुन घडला. घडल्या प्रकाराचा एक व्हिडिओही (Attack on Singer Sonu Nigam Videos) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. निगम याला मारहाण करणारे लोक उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा मुलगा आणि त्याचे अंगरक्षक असल्याचा दावा केला जात आहे.

गायक सोनू निगमच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहीता कलम 323 , 341, आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. डीसीपी हेमराजसिंग राजपूत यांनी पत्रकारांना सांगितले की, "लाइव्ह कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने त्याला पकडले. यावर सोनूने आक्षेप घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सोनू निगम आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना पायऱ्यांवरून ढकलले, त्या दोघांपैकी एक जण जखमी झाला. आरोपीचे नाव स्वप्नील फातर्पेकर आहे.

मुंबई येथील चेंबूर येथे सोमवारी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गायक सोनू निगम हा देखील उपस्थित होता. कार्यक्रम संपला आणि व्यासपीठावरील सर्व कलाकार (सोनू निगम याच्यासह) खाली उतरत होते. दरम्यान, पायऱ्यांवरुन उतरत असलेल्या सोनू निगम याच्यावर अचानक हल्ला झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की , व्यासपीठावर जाण्यासाठी केलेल्या शिडीवरुन सोनू निगम खाली कोसळत आहे. काही बॉडिगार्ड आणि उपस्थित लोक त्याचा बचाव करण्यासाठी धावतानाही दिसत आहेत. (हेही वाचा, BMC चीफ Iqbal Singh Chahal यांच्या भावाकडून Sonu Nigam ला धमक्या; पाठवले अपमानास्पद संदेश, जाणून घ्या कारण)

ट्विट

दरम्यान, स्वाती बेलम नावाच्या @BellamSwathi या ट्विटर हँडलवरुन सोनू निगम याला झालेल्या कथीत मारहाणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच, हा व्हिडिओ शेअर करताना लिहीलेल्या पोस्टमध्ये हँडलने दावा केला आहे की, सोनू निगमला मारहाण्याच्या गुन्ह्यातील आरोपी हे उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे आमदार आणि त्यांचे अंगरक्षक असल्याचा आरोप आहे. अहवालात असा दावा केला आहे की आमदाराच्या मुलाला गायकासोबत फोटो काढायचा होता. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली, म्हणून त्याने आणि त्याच्या माणसांनी गायकाच्या व्यवस्थापकाशी गैरवर्तन केले आणि बॅकस्टेजवर आलेल्या सोनू निगमला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर गायकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.