Shreyas Talpade: Welcome 3 चित्रपटातून मोठी अपडेट समोर, श्रेयस तळपदे सिनेमातून बाहेर?
आता आजारपणामुळे तो चित्रपटातून बाहेर जाणार का ? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे.
Shreyas Talpade: 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचं शुटींग सुरु असताना, श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा झटका आला होता. या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराच्या झटका आल्यामुळे बॉलिवूड क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आता आजारपणामुळे तो चित्रपटातून बाहेर जाणार का ? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. तर दिग्दर्शकाने या संदर्भात सांगितले आहे की, 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचं चित्रीकरण वेळेतच होणार आहे.
बॉलिवूडलाईफच्या वृत्तानुसार, ठरलेल्या वेळेतच शुटींग होईल. काहीही झालं तरी 'शो मस्ट शो गॉन' असं म्हटलं जात आहे. इतर कलाकारांनी श्रेयसच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त केली. कोणत्याही कारणाने चित्रपटाचं शुटिंग थांबवलं जाणार नाही, श्रेयसची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याच्या सीन शुट केले जाईल अशी माहिती दिली आहे. प्रेक्षकांना देखील श्रेयच्या प्रकृतीची चिंता होती.
हा चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चित्रपटाचं शुटींग सुरु करण्यात आला आहे. या चित्रपटाचं शुटिंग क्स्रिमसच्या सुट्टीत शेड्यूल करण्यात आलं होतं. तर नव्या वर्षातही या सिनेमाचं शुटिंग होणार आहे. या दिवसांत लोक सुट्टीवर असतात,या गोष्टीची दखल घेत नाताळात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलं होतं.