शिल्पा शेट्टी चा मराठमोळ्या अंदाजातील टिकटॉक व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून खळखळून हसाल, Watch Video

त्यावर राज आणि शिल्पा च्या खट्याळ गोष्टी पाहून तुम्हाला पोट धरून हसायला लावतील.

Shilpa Shetty (Photo Credits: Tiktok)

बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) सध्या सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. विशेषत: तिचे टिकटॉक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कालच तिचे टिकटॉकचे 15 मिलियन फॉलोअर्स झाले. ही बातमी तिने आपल्या मुली सह चाहत्यांसोबत शेअर केली.तिचे आणि तिच्या पतीचे म्हणजेच राज कुंद्रा चे अनेक टिकटॉक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नुकताच तिने एक नवा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा एक मराठमोळ्या गाण्यावर व्हिडिओ आहे. त्यावर राज आणि शिल्पा च्या खट्याळ गोष्टी पाहून तुम्हाला पोट धरून हसायला लावतील.

पाहा व्हिडिओ:

@theshilpashettyMere gaane pe itna “gira hua” reaction diya @therajkundra ne😈😂🤪 ##patipatni ##comedy ##marathimuser ##funny ##tiktok♬ original sound - मराठी Aquaman

हेदेखील वाचा- शिल्पा शेट्टी साठी '15' नंबर ठरला लकी, आपल्या मुलीसह सोशल मिडियावर शेअर केली 'ही' आनंदाची बातमी, Watch Video

शिल्पा शेट्टी या व्हिडिओमध्ये 'सूया घे पोत घे' या गाण्यावर यावर धमाल हावभाव देताना दिसत आहे.कालच शिल्पाने आज 15 एप्रिल च्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. इतकच नव्हे तर तिने आपले एक सिक्रेट देखील आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. 15 नंबर हा तिचा लकी नंबर असल्याचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिशा हिचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आणि आज 15 एप्रिल तिला 2 महिने पूर्ण झाले त्यासोबतच आजच तिचे टिकटॉकवर 15 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. त्यामुळे आपल्याला 15 नंबर हा खूप लकी असल्याचे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.