Shilpa Shetty ची मुलगी समिशाने वडिल राज कुंद्राच्या सूरात मिळवले सूर, पाहा बाप-लेकीचा गातानाचा क्युट व्हिडिओ, Watch Video

ज्यात समिशाही अगदी निरागसपणे आपल्या शैलीत वडिलांच्या सूरात सूर मिळवत आहे

Samisha Shetty Video (Photo Credits: Instagram)

सध्या बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा स्टार किड्सची सर्वत्र चर्चा जास्त आहे. तैमुर, समिशा (Samisha), इनाया,आराध्या सह अनेक बॉलिवूड स्टारकिड्स ने सोशल मिडियावर देखील धुमाकूळ घातला आहे. या सर्वांनी स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या सर्वांचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यातच आता एक शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) ची मुलगी चिमुकल्या समिशाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral VIdeo) होत आहे. या व्हिडिओमध्ये समिशा चक्क आपले बाबा राज कुंद्रा (Raj Kundra) सोबत गाणं गातााना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये राज कुंद्रा समिशाला गाणं बोलायला शिकवत आहे. ज्यात समिशाही अगदी निरागसपणे आपल्या शैलीत वडिलांच्या सूरात सूर मिळवत आहे.हेदेखील वाचा- कर्जतचा वडापाव खाण्याचा Shilpa Shetty ला देखील आवरला नाही मोह, केले असे काही पाहून तुम्हालाही येईल हसू, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

या व्हिडिओला काही मिनिटांत लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिल्पा शेट्टी ब-याचदा आपल्या मुलीला मिडियापासून थोडे दूरच ठेवले आहे. त्यामुळे तिची पाठमोरी झलकच अनेकदा कॅमे-यात टिपण्यात आली. अलीकडे मात्र शिल्पा गाडीतून उतरत असताना समिशाच्या चेह-याची हलकीशी झलक आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र आता मात्र शिल्पाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये समिशा अगदी स्पष्ट दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये समिशाच्या निरागस आणि भाबडे बोल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा हे देखील आपले असंख्य व्हिडिओज बनवत असतात. लॉकडाऊनच्या काळात तर टिकटॉकवर त्यांचे मिलियनहून अधिक फॉलोअर्स बनले होते.