Shilpa Shetty आणि Raj Kundra ने मुलगा Viaan ला वाढदिवसानिमित्त दिले 'हे' सरप्राईज गिफ्ट, पाहून वियान झाला भावूक

वियान देखील हे गिफ्ट पाहून प्रचंड खूश झाला. आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे त्याच्या हावभावावरुन दिसत आहे.

Shilpa Shetty Kundra With Her Family (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा मुलगा वियान (Viaan) आज 10 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी वियानला त्याला आवडेल असे खूपच सुंदर असे सरप्राईज गिफ्ट (Surprise Gift) दिले. हे गिफ्ट पाहून वियानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. वियानला आज 9 वर्षे पूर्ण झाली. या दिनाचे औचित्य साधून शिल्पा आणि राज कुंद्रा ने मुलाला दिलेल्या वचनाचे पालन करत हे गिफ्ट दिले आहे. वियान देखील हे गिफ्ट पाहून प्रचंड खूश झाला. आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे त्याच्या हावभावावरुन दिसत आहे.

शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राज आणि शिल्पा वियानचा डोळा चुकवून त्याच्यासाठी कुत्र्याचं पिल्लू घेऊन येताना दिसत आहे. "सादर करित आहोत आमचा नवा फॅमिली मेंबर ट्रफल. वियान खूप दिवसांपासून घरात पाळीव प्राणी आणूया असा हट्ट करत होता. तेव्हा मी त्याला तू 10 वर्षांचा झाल्यानंतर तुला पाळीव प्राणी आणेन असे सांगितले होते. वियानने एक वर्ष आधीच तो मिळवला आहे. वियान एक खूप चांगला मुलगा आहे. हॅप्पी बर्थडे माझा डार्लिंग" असे शिल्पाने या पोस्टखाली लिहिले आहे.हेदेखील वाचा- Disha Patani चा Back Flip व्हिडिओ व्हायरल; स्टंटबाजीसाठी चाहत्यांकडून कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसेल की, वियानला हा कुत्रा पाहून किती आनंद झाला आहे. तो त्या पिल्लाला आपल्या कुशीत घेत आहे. या व्हिडिओ अनेक चाहत्यांनी कमेंट्स केले असून वियानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या मुलाचे कौतुक करत शिल्पा म्हणाली, माझा मुलगा एक जबाबदार मुलगाच्या रुपात मोठा होत आहे. ज्याने लॉकडाऊनपासूनच स्वत:ला नव्या रुपात आणले आहे. त्याने कोरोनालाही मोठ्या धैर्याने तोंड दिले आहे. त्याचबरोबर एक जबाबदार भावाच्या रुपात आपल्या बहिणीचीही त्याने काळजी घेतली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif