Tanhaji Trailer च्या पत्रकार परिषदेदरम्यान शरद केळकर याच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या उत्तराने जिंकली लाखो मराठ्यांची मने, चाहत्यांनी 'अशा' शब्दांत केले कौतुक
त्याच्या या उत्तराने न केवळ तिथे उपस्थित असलेल्यांची मने जिंकली तर तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्या सर्वांची छाती अभिमानाने भरुन आली.
मराठ्यांची शौर्यगाथा मांडणारा तानाजी: द अनसंग वॉरियर (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या निमित्ताने पत्रकारांसाठी विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत अजय देवगण( Ajay Devgan), सैफ अली खान (Saif Ali Khan) सह चित्रपटातील अन्य कलाकार देखील उपस्थित होते. त्यावेळी प्रश्नोत्तरांच्या वेळी एका पत्रकाराने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर याला प्रश्न विचारला. या प्रश्नात पत्रकाराने छत्रपतींचा उल्लेख शिवाजी असा केला, त्यावेळी त्वरित त्याचा प्रश्न विचारायच्या आधी 'छत्रपती शिवाजी महाराज' असे म्हणत शरद केळकर याने पत्रकाराची चूक दाखवून दिली. त्याच्या या उत्तराने न केवळ तिथे उपस्थित असलेल्यांची मने जिंकली तर तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्या सर्वांची छाती अभिमानाने भरुन आली.
14 सेकंदाचा हा व्हिडिओ काही वेळातच इतका व्हायरल झाला की सर्वांनी अगदी शरद केळकरच्या चाहत्यांपासून मराठी बाणा जपणारे मराठे देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
पाहूयात ट्विटर च्या माध्यमातून आलेल्या प्रतिक्रिया:
"सर, तुम्ही तुमच्या दमदार आवाजाचा योग्य वापर केलात" असेही अनेकांनी ट्विट केले.
तर "तुम्ही खरे बाहुबली आहेत" असेही काही जण म्हणाले.
"सर, तुम्ही जिंकलात, तुम्ही कमवलात आम्हाला," अशा शब्दांत नेटक-यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद चे कौतुक केले आहे.
तानाजी हा सिनेमा ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा असून 10 जानेवारी 2020 दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अनेक दिवसांनी काजोल- अजय देवगण ही रिअल लाईफ जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तानाजी या सिनेमाच्या माध्यमातून काजोल पहिल्यांदाच मराठमोळ्या आणि ऐतिहासिक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार असल्याने आता तिच्या मराठी चाहत्यांमध्येही या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
यात अजय-काजोल सह सैफ अली खान, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.