Shankara Song in Tanhaji: तान्हाजी चित्रपटातील पहिले गाणे 'शंकरा रे शंकरा गाणे प्रदर्शित', अजय देवगण धरला नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यच्या तालावर ठेका, Watch Video
तसेच डान्सशी 36 चा आकडा असलेल्या अभिनेता अजय देवगण कडून या गाण्यामध्ये गणेश आचार्यने चांगलेच नाचवून घेतले असे दिसतेय. तसेच या गाण्यातील स्टेप्स पाहून यातील काही स्टेप्स सिग्नेचर स्टेप्स बनतील असंच दिसतय.
अंगावर काटा आणणारा 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयी उत्कंठा अजूनच वाढली आहे. अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील गाण्यांवाषियीही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यांची उत्सुकता आता संपली असून या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले. 'शंकरा रे शंकरा' (Shankara re Shankara) असे या गाण्याचे बोल असून हे मेहुल व्यास यांनी गायिले आहे. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी केले आहे. गणेश आचार्य यांनी आजपर्यंत अशा अनेक ऐतिहासिक चित्रपटातील गाण्यांच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मल्हारी, ततड ततड, खलीबली ही त्यातीलच काही निवडक गाणी.
तान्हाजी चित्रपटातील या गाण्यामध्ये मोठ्या संख्येने बॅक डान्सर्सही दिसतील. तसेच डान्सशी 36 चा आकडा असलेल्या अभिनेता अजय देवगण कडून या गाण्यामध्ये गणेश आचार्यने चांगलेच नाचवून घेतले असे दिसतेय. तसेच या गाण्यातील स्टेप्स पाहून यातील काही स्टेप्स सिग्नेचर स्टेप्स बनतील असंच दिसतय.
पाहा शंकरा रे शंकरा गाणे:
अनिल वर्मा यांनी हे गाणे लिहिले असून मेहुल व्यास यांनीच गायकाची आणि संगीतकाराची धुरा सांभाळली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अजय देवगण, भूषण कुमार, कृष्णन कुमार यांनी बजावली आहे.
या सिनेमात अजय देवगण सह काजोल, सैफ अली खान, शरद केळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या अंदाजात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर तर तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई काजोल साकारणार आहे.