बॉलिवूडमधील किंग खान शाहरुख ह्याला युनिव्हर्सिटी ऑफ लॉ लंडन मधून डॉक्टरेट पदवी प्रदान

बॉलिवूड मधील किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) ह्याला युनिव्हर्सिटी ऑफ लॉ लंडन (University Of Law, London) मधून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

Shahrukh Khan (Photo Credits- Twitter)

बॉलिवूड मधील किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) ह्याला युनिव्हर्सिटी ऑफ लॉ लंडन (University Of Law, London) मधून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख आता डॉ. शाहरुख खान झाला आहे. शाहरुखने ही पदवी प्रदान करते वेळचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून युनिव्हर्सिटीने त्याचे आभार मानले आहेत.

शाहरुख ह्याला फिलांथ्रोपी विषयासाठी पदवी देण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा शाहरुख ह्याला युनिव्हर्सिटी ऑफ बेडपोर्डशायर आणि एडिनबर्ग मधून डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली आहे. तर शाहरुख ह्याला ही पदवी देताना युनिव्हर्सिटीचे 350 विद्यार्थी त्यावेळी उपस्थित होते.(हेही वाचा-अभिनेता इरफान खान ह्याचा कॅन्सरशी यशस्वी लढा, चाहत्यांचे मानले आभार)

तर सोशल मीडियावर आता शाहरुखला डॉक्टरेट पदवी मिळाल्यामुळे चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच शाहरुख सुद्धा मिळालेल्या पदवी मुळे अत्यंत खुश असल्याचे त्याने म्हटले आहे.