Loksabha Elections 2019: शाहरुख खान म्हणतो करो मतदान, मोदींचं आवाहन स्वीकारत किंग खान ने बनवला म्युजिक व्हिडीओ (See Video)

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलीवूड स्टार्सना केलेलं मतदानाची जागृती करण्याचं आवाहन स्वीकारून शाहरुख खानने करो मतदान नावाचा एक रॅप म्युजिक व्हिडीओ तयार केला आहे.

Shah Rukh Khan's Music Video "Karo Matdan" (Photo Credits: Red Chillies Entertainment)

किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो, मग ते त्याच्या चित्रपटाचे विषय असूदेत किंवा अवॉर्ड शोज मधील भाषण आपल्या मजेशीर स्वभावाने आणि भाषेच्या चपखल वापराने बॉलीवूडचा बादशाह आजही फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. सेलिब्रिटींच्या या लोकप्रियतेचा वापर करून जन सामान्यांमध्ये मतदान विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) काही दिवसांआधी आपल्या ट्विटर वरून काही बॉलिवूड स्टार्सना मतदान जागृती करण्याचं आवाहन केलं होत.यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सलमान खान (Salman Khan),अक्षय कुमार (Akshay Kumar),ए.आर.रेहमान (AR Rahman), रणवीर सिंग (Ranveer Singh), विकी कौशल (Vicky Kaushal), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), आलिया भट (Alia Bhatt), अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या व अन्य अनेक कलाकारांनी सहभाग घेऊन आपापल्या पद्धतीने लोकांना मतदान करण्याचे संदेश दिले. मात्र शाहरुख खानने हे आवाहन अगदी नेटाने स्वीकारत 'करो मतदान' (Karo Matdan) हा एक म्युजिक व्हिडिओच तयार केलाय.

या व्हिडिओत मतदानाचं महत्व सांगत शेवटी तुमच्या बोटावरची शाईच आपल्या देशाचं भविष्य ठरवेल त्यामुळे मतदान कराच असा संदेश किंग खान ने दिला आहे. या सोबतच शेवटी या गाण्याचा उद्देश हा केवळ जनजागृती करणं इतकाच असून कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नसल्याचं देखील शाहरुखने स्पष्ट केलं.

 'करो मतदान' (Karo Matdan) (See Video)

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत, "मोदींनी केलेल्या आवाहनाला स्वीकारून काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं, त्या साठी हे गाणं बनवायला थोडा उशीर झाला मात्र तुम्ही मतदानाला उशीर करू नका, मतदान हा फक्त हक्क नसून आपली ताकद आहे त्याचा योग्य वापर करा" असा सल्ला लोकांना दिला आहे

शाहरुख खान ट्विट 

लोकसभा निवडणूकांचे वारे देशभर वाहत असताना शाहरुखच्या या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या तासाभरातच या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळालेत. 'करो मतदान' साठी ऍबी विरल (Abby Viral) लिखित आणि तनिष्क बागची (Tanishk Bagchi) याने संगीतबद्ध केलेलं हे गाणं शाहरुखने स्वतः गायलं आहे.