बॉलिवूडचा किंग Shahrukh Khan ने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत केली 'ही' मोठी घोषणा, Watch Video

शाहरुखने नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला उशीर केल्याबद्दल त्याने चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे

शाहरुख खान (Photo credit: Twitter @ShahRukhKhanFC)

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shahrukh Khan) याने सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा (New Year Wishes) दिल्या. याबाबतीत त्याने एक व्हिडिओ शेअर केला असून आपल्याला हा व्हिडिओ शेअर करण्यास थोडा विलंब झाला असून त्याने सर्व चाहत्यांची माफी मागितली. किंग खानने ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याची टीम नसल्यामुळे हा व्हिडिओ त्याला स्वत:लाच शूट करावा लागला. या व्हिडिओ दरम्यान अनेक गंमतीदार गोष्टी घडल्या. मात्र तरीही हा व्हिडिओ बनवून या व्हिडिओच्या शेवटी शाहरूखने एक मोठी घोषणा केली.

शाहरूखने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला माशा आणि डासांचा आवाज ऐकू येताच स्वत: किंग खानही अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. शाहरुखने नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला उशीर केल्याबद्दल त्याने चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.हेदेखील वाचा- Amitabh Bachchan On New Year: 2020 वर्ष अत्यंत विचित्र; मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये चांगले अनुभव येतील - अमिताभ बच्चन

शाहरुखने व्हिडिओमध्ये म्हटलं की, '2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूपचं वाईट गेलं आहे. पण मला विश्वास आहे की जेव्हा कोणी आपल्या आयुष्यात सर्वात खाली पोहचतो. तेव्हा एकच पर्याय उरतो. तो म्हणजे पुन्हा नव्याने उत्तुंग भरारी घेण्याचा.  2020 हे वर्ष जसं का असेना पण तो आता आपला भूतकाळ आहे. त्यामुळं मला विश्वास आहे की, 2021 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप सुंदर वर्ष असेल.' असे शाहरुखने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

दरम्यान या व्हिडिओच्या शेवटी "2021 मध्ये आपण सर्वजण आपण पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर भेटणार आहोत" असे सांगितले. शाहरुखचा हा व्हिडिओ समोर येताच ट्विटरवर त्याचा आगामी चित्रपटाचा #Pathan ट्रेंड झाला.

नुकतचं शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या 'पठाण' या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहमही दिसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif