Yasmin Karachiwala & Salman Khan (Photo Credits: Instagram)

Salman Khan Workout Video: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चे देशभरात करोडो चाहते आहेत. सलमान खान चा अभिनय, हटके स्टाईल, नटखट अंदाज चाहत्यांना भावतोच. पण त्याचप्रमाणे सलमान फिटनेस साठी देखील ओळखला जातो. सलमान खान याला वर्कआऊट करायला खूप आवडतं, हे त्याच्या चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे. आज सलमान खान याने सोशल मीडियावर एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सलमान बॉलिवूडची प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला (Yasmin Karachiwala) हिच्यासोबत वर्कआऊट करताना दिसत आहे.

सलमान ने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये दोन व्हिडिओज शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या व्हिडिओत यास्मिन वर्कआऊट करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत खुद्द सलमान जिममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सलमानच्या फिटनेसची प्रशंसा करण्यासाठी चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Salman Khan ने साजरा केला बॉडीगार्ड जग्गी चा बर्थडे; केक मिळताच केली अशी गंमत, Watch Video)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान, अलिकडचे यास्मिनने सलमान खान सोबत नव्या फिटनेस मशीनवर व्यायाम करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यास्मिन बॉलिवूडची प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर असून तिने आतापर्यंत कॅटरिना कैफ, करीना कपूर, मलायका अरोरा यांच्यासह अन्य अभिनेत्रींना ट्रेनिंग दिली आहे. (Salman Khan Shirtless Photo: सलमान खान शर्टलेस फोटो सोशल मिडियावर झाला व्हायरल, फिट बॉडी पाहून चाहते झाले थक्क)

सलमान खान सध्या टीव्ही शो बिग बॉस 14 चे होस्टिंग करत आहे. त्याचबरोबर त्याचा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा 2021 मध्ये ईद च्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.