Radhe Release: 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्म सह थिएटरमध्ये होणार प्रदर्शित; ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला

सिनेमागृह बंद असल्याने अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. तर अनेक सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. यापैकी एक सिनेमा म्हणजे सलमान खान चा बहुचर्चित सिनेमा 'राधे'.

Salman Khan's Radhe Movie Poster (Photo Credits: Instagram)

Salman Khan's Movie Radhe Release: कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम फिल्म इंडस्ट्रीवर देखील झाला. सिनेमागृह बंद असल्याने अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. तर अनेक सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. यापैकी एक सिनेमा म्हणजे सलमान खान चा बहुचर्चित सिनेमा 'राधे'. हा सिनेमा मागील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार होता. परंतु, कोविड-19 लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. मात्र ईद 2021 च्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलजी होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. तर आज निर्मात्यांनी सिनेमाबद्दल नवी घोषणा केली आहे. थिएटर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स दोन्ही माध्यमातून हा सिनेमा रिलीज होणार आहे, असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

ईदच्या रिलीजची परंपरा लक्षात घेऊन सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमासाठी मेगा रिलीजची योजना आखली आहे. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर थिएटर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर 13 मे 2021 रोजी प्रदर्शित होईल.

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan Films (@skfilmsofficial)

सरकारने जारी केलेल्या कोविड-19 नियमांचे पालन करुन 'राधेः तुमचा मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येईल. झी5 च्या 'पे पर व्यू' सर्व्हिस ZEEPlex वर रिलीज केली जाईल. सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर म्हणजेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवर या सिनेमाचा आस्वाद घेता येईल. यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या सिनेमाचा आस्वाद घेता येईल.

'राधे: आपला मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमात सलमान खान शिवाय दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ देखील आहेत. झी स्टुडिओसमवेत सलमान खान फिल्म्सने हा निर्मित केला आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा सिनेमा यंदा ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif