Salman Khan Private Room Video: Bigg Boss 14 च्या घरात अशी असेल सलमान खान ची प्रायव्हेट रुम; पहा व्हिडिओ

आता सलमान खान याच्या प्रायव्हेट रुमचा व्हिडिओ समोर आला आहे. पहा त्याच्या आलिशान रुमचा व्हिडिओ...

Salman Khan's Chalet at Bigg Boss 14 (Photo Credits: Instagram/Ashely Rebello)

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आजपासून या शो च्या प्रसारणाला सुरुवात होणार आहे. कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा बिग बॉसचा सीजन काहीसा हटके असणार आहे. त्यामुळे यंदा बिग बॉसच्या घरात नेमकी कशी धम्माल उडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहेत. यापूर्वी बिग बॉसच्या आलिशान घराचे फोटोज समोर आले होते. आता सलमान खान याच्या प्रायव्हेट रुमचा (Private Room) व्हिडिओ समोर आला आहे. विविध सोयी-सुविधांनी सज्ज अशी सुंदर रुम बिग बॉस ने सलमान खान साठी तयार केली आहे.

बिग बॉसच्या घरातील सलमान खान याच्या प्रायव्हेट रुमचा व्हिडिओ फॅशन डिझाईनर Ashely Rebello ने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. घरात गार्डन, डायनिंग टेबल, जीम, पर्सनल टीव्ही यांसारख्या सुविधा आहेत. विशेष म्हणजे या रुममध्ये सलमान खान याचे 'दबंग', 'एक था टायगर' या सिनेमातील मोठेमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसंच बेड आणि इतर आवश्यक वस्तूंनी सुसज्ज अशी ही रुम खऱ्या अर्थाने आलिशान आहे. (सलमान खान च्या 'बिग बॉस 14' च्या आलिशा घराचे फोटो आले समोर, पाहा कल्पनेपेक्षाही सुंदर असे घराचे Inside फोटोज)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

His little BB #chalet , a sneak peak for u

A post shared by Ashley Rebello (@ashley_rebello) on

यंदा बिग बॉसच्या घरात राधे माँ, पवित्रा पुनिया, निशांत सिंह मलकानी, जॅस्मीन भसीन, रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे स्पर्धक म्हणून दाखल होती, असे बोलले जात आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बिग बॉसच्या घरात विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यंदा घरात डबल बेड नसेल. तसंच बेड, प्लेट, ग्लास शेअरींगला परवानगी नसेल. विशेष म्हणजे यंदा कोणताही फिजिकल टास्क होणार नाही आणि दर आठवड्याला स्पर्धकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसाठी मिनी थिएटर, मॉल आणि रेस्टोरन्टची सुविधा देण्यात येईल. त्यामुळे यंदा बिग बॉसच्या घरात वेगळीच गंमत पाहायला मिळणार यात शंका नाही.