सलमान खान कॅन्सरग्रस्त मुलांच्या भेटीला ; व्हिडिओ व्हायरल
लिकडेच त्याने प्रेक्षक, चाहत्यांची मने जिंकण्यासारखे काम केले आहे. सोमवारी सलमानने मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावून आपल्या छोट्या फॅनला भेटला.
बॉलिवूडचा दबंग खान नटखट अंदाज, हटके डान्स स्टाईल आणि दमदार व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय आहे. त्याचबरोबर त्याचे लहान मुलांवरील त्याचे प्रेम आणि मदत करण्याचा स्वभाव देखील सर्वश्रूत आहे. सलमानच्या या स्वभावामुळेच त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. अलिकडेच त्याने प्रेक्षक, चाहत्यांची मने जिंकण्यासारखे अजून एक काम केले आहे. सोमवारी सलमानने मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावून आपल्या छोट्या फॅनला भेटला. तेथे त्याने कॅन्सरग्रस्त एका लहान मुलाची भेट घेतली. फक्त भेट नाही तर सलमानने त्याच्याशी गप्पाही मारल्या.
हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सलमान एका लहान मुलाशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.
गोविंदा नावाच्या एका व्यक्तीने सलमान खानला विनंती केली की, "त्याच्या पत्नीचा भाचा टाटा हॉस्पिटलमध्ये असून त्याची एकदा भेट घ्या आणि त्याचबरोबर इतर मुलांनाही भेटा."
या विनंतीला मान देऊन सलमान खानने त्या मुलाची भेट घेतली आणि त्यासोबत हॉस्पिटलमधील इतर मुलांनाही भेटला.
सलमान खानचे सामाजिक फाऊंडेशन 'बीईंग ह्युमन ट्रस्ट' आजारी आणि गरजूंना आर्थिक साहाय्य करत असतं. या ट्रस्टतर्फे अनेक गरजूंना मदत मिळाली आहे.
सलमान लवकरच भारत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात सलमान खानसोबत कतरिना कैफ झळकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत असून हा सिनेमा 2019 ला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2018 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

