Salman Khan Turns 55: सलमान खान ने पनवेल फार्महाऊस वर कापला बर्थडे केक; पहा सेलिब्रेशनचे Photos

कुटुंबियांसमवेत सलमान खान ने आपल्या पनवेल मधील फार्महाऊस वर बर्थडे केक कट केला. या सेलिब्रेशनचे खास फोटोज समोर आले आहे.

Salman Khan Birthday Celebration (Photo Credits: Yogen Shah)

Salman Khan 55th Birthday: बॉलिवूड चा भाईजान सलमान खान चा आज 55 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जगभरातून सलमान खान (Salman Khan) वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पनवेल फार्महाऊसवर बर्थडे सेलिब्रेट करण्याची परंपरा यंदाही सलमान ने कायम राखली आहे. कुटुंबियांसमवेत सलमान खान ने आपल्या पनवेल (Panvel) मधील फार्महाऊस वर बर्थडे केक (Birthday Cake) कट केला. या सेलिब्रेशनचे खास फोटोज समोर आले आहे. (Salman Khan 55th Birthday: कोविड 19 परिस्थितीचं भान ठेवत यंदा वाढदिवसानिमित्त गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी न करण्याचं सलमान खान चं चाहत्यांना आवाहन)

या फोटोत तुम्ही पाहू शकाल, सलमान खआन ने स्काय ब्लू रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. आपल्या खास शैलीत सलमान केक कापताना दिसत आहे. सल्लू भाईच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात असलेल्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमते. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे गर्दी न करण्याचं आवाहन सलमानने चाहत्यांना केलं आहे.

सलमान खान बर्थडे सेलिब्रेशन फोटोज:

Salman Khan Birthday Celebration (Photo Credits: Yogen Shah)
Salman Khan Birthday Celebration (Photo Credits: Yogen Shah)
Salman Khan Birthday Celebration (Photo Credits: Yogen Shah)

यंदा कोरोना व्हायरस संकट आणि त्यामुळे असलेले निर्बंध यामुळे कमी सेलिब्रिटी पार्टीत सहभागी झाले. वडील सलीम खान, बहीण अलविरा अग्निहोत्री पनवेल फार्महाऊसवर दाखल झाले आहेत. याशिवाय बाबा सिद्दीकी, शाइना एनसी, अभिनेता सुनील ग्रोवर यांच्यासमवेत इतर पाहुणे बर्थडे सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहचले आहेत.

मुकेश छाबड़ा (Photo Credits: Yogen Shah)
अलविरा अग्निहोत्री खान (Photo Credits: Yogen Shah)
बाबा सिद्दीकी (Photo Credits: Yogen Shah)
मुदस्सर खान (Photo Credits: Yogen Shah)
सलीम खान (Photo Credits: Yogen Shah)
शाइना एनसी (Photo Credits: Yogen Shah)
सुनील ग्रोवर (Photo Credits: Yogen Shah)

सलमान खान सध्या टीव्ही शो बिग बॉस 14 चे होस्टिंग करत आहे. त्याचबरोबर त्याचा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा 2021 मध्ये ईद च्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या 'अंतिम-द फायनल ट्रुथ' सिनेमाच्या शुटींगमध्ये तो व्यस्त आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif