सैफ अली खान च्या "मी सुद्धा नेपोटिजमचा शिकार झाला होतो" या विधानामुळे सोशल मिडियावर झाला ट्रोल
त्याच्या या विधानाने सर्वांना अचंबित केले आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर नेपोटिजम (Nepotism), बॉलिवूडमधील खुरापती यांसारख्या गोष्टींना उधाण आले आहे. अशातच नेपोटिजमचे शिकार झालेले अनेक कलाकार पुढे आले असून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. याच दरम्यान अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) याने देखील द न्यू इंडियन एक्सप्रेस ला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा करत आपण नेपोटिजमचे शिकार झालो आहोत असे सांगितले आहे. त्याच्या या विधानाने सर्वांना अचंबित केले आहे.
सैफ अली खान ने आपल्या मुलाखती दरम्यान असे सांगितले होते की,"भारतात असमानता आहे, ज्याला बदलण्याची गरज आहे. येथे भाऊ, भाचा, पक्षपात इतकच काय तर विशेष वर्गाला जास्त महत्व देणे आणि ख-या टॅलेंटेड लोकांना मागे ढकलणे असा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली असून मी ह्या गोष्टीचा शिकार झालो आहे. मात्र मला यात रस नाही. अनेकदा निर्मात्यांना स्टार किड्सच्या वडिलांचा फोन येतो, जेथे याला घेऊ नका असे सांगण्यात येते. यामुळे देखील मला अनेकदा चित्रपटातून काढले आहे." Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो
सैफच्या या विधानानंतर तो सोशल मिडियावर ट्रोल होऊ लागला आहे. एका यूजर्सने लिहिले की, "सैफ अली खान चे म्हणणे आहे की तो घराणेशाहीचा शिकार आहे. मग त्याला हम तुम साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांची आई राष्ट्रीय पुरस्कार ची ज्यूरी सदस्य होती."
एका ने असेही सांगितले की, "सैफ अली खान नहीं तर तैमुर अली खान सुद्धा घराणेशाहीचा शिकार आहे."
जर सैफ अलीखान नेपोटिजमचे शिकार असतील तर अनन्या पांडेचा संघर्ष सुद्धा खरा आणि वास्तविक आहे.