Adipurush: सैफ अली खान याचा चित्रपट 'आदिपुरुष' प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात; कारण घ्या जाणून
आदिपुरुष (Adipurush) असे या चित्रपटाचे नाव आहे.
'तानाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटामध्ये उदयभान राठौडची भूमिका साकरल्यानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan) लवकरच एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आदिपुरुष (Adipurush) असे या चित्रपटाचे नाव आहे. तो या चित्रपटात लंकेश अर्थात रावणाची भूमिका साकरणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतीच सैफने मुंबई मिररला मुलाखात दिली आहे. त्याला या मुलाखतीत रावणाची सकारात्मक बाजू मांडणे भलतेच महागात पडले आहे. दरम्यान, सैफने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीकेचा वर्षा केला जात आहे.
'राक्षसी राजाची व्यक्तिरेखा साकारणे मनोरंजक आहे, परंतु तो इतके क्रूर नव्हता. रावण हा माणूस म्हणून कसा होता? याचे चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, या युद्धालाही एक पार्श्वभूमी आहे. श्री रामाच्या धाकटा भाऊ लक्ष्मण यांनी रावणाची बहीण सुर्पनखाचे नाक कापले होते. त्यांनतर हे युद्ध होणारच होते. रावणची विचारसरणी काय होती? हे या चित्रपटातून प्रेक्षकांच्यासमोर घेऊन येणार आहोत, असे सैफ मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे. सैफ यांच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला जात आहे. एवढेच नव्हेतर, सैफला या चित्रपटातून काढून टाका, अशी मागणी नेटकऱ्यांनी दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडे केली आहे. हे देखील वाचा- Punyashlok Ahilyabai Serial: पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित, 'हे' मराठी कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत