IPL Auction 2025 Live

Sadak 2: आलिया भट्ट-संजय दत्त चा चित्रपट 'सडक 2' ठरला IMDB चे सर्वात कमी रेटिंग मिळालेला सिनेमा

ही रेटिंग पाहता प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरविली आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाने तुर्किश चित्रपट कोड नेम: के.ओ. जेड ला मिळालेल्या 1.3 रेटिंगला मागे टाकले आहे.

सडक-२ कलाकार (Photo Credits: File Photo)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर नेपोटिजम विरुद्ध सुरु झालेली युद्ध आता चांगलचं पेटू लागलं आहे. याचा पहिला फटका किंबहुना जोरदार फटका बसला तो महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित 'सडक 2' (Sadak 2) या चित्रपटाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला युट्यूबवर सर्वाधिक डिस्लाइक्स मिळाले होती. ही संख्या जवळपास 4.5 मिलियन च्या घरात होती. त्यानंतर हा चित्रपट आता डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित झाली आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) यांची प्रमुखे भूमिका असलेला हा चित्रपट सपशेल आपटला असून प्रेक्षकांसोबत IMDB ने ही याकडे पाठ फिरवली आहे. सडक 2 हा IMDB चा सर्वाधिक कमी रेटिंग मिळालेला चित्रपट ठरला आङे.

या चित्रपटाला IMDB ने 10 पैकी 1.1 रेटिंग दिली आहे. ही रेटिंग पाहता प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरविली आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाने तुर्किश चित्रपट कोड नेम: के.ओ. जेड ला मिळालेल्या 1.3 रेटिंगला मागे टाकले आहे. Sadak 2 Leaked on TamilRockers for Free Download & Watch Online: आलिया भट्ट-संजय दत्त यांचा 'सड़क 2' तमिलरॉकर्स वर झाला लीक

Sadak 2 (Photo Credits: IMDB)

इतकच नव्हे तर हा असा फ्लॉप चित्रपट पाहणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे असे अनेक प्रेक्षकांनी म्हटले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे याच्या गाण्यांकडे देखील प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

‘सडक 2’ हा चित्रपट महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासाठी फार महत्वाचा होता. कारण तब्बल 2 दशकानंतर ते या चित्रपटाद्वारे दिग्दर्शिक पदार्पण करीत होते.. मात्र सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर देशात चित्रपट सृष्टीमधील घराणेशाहीबाबत संताप दिसून येत आहे. त्याची झळ या चित्रपटाला सोसावी लागत आहे.