रितेश देशमुख ची मुले रियान आणि राहिल ने कागदाच्या बोळ्यापासून घडवली 'ही' सुंदर इको फ्रेंडली गणेश मूर्ती, Watch Viral Video
या व्हिडिओमध्ये रितेशची मुले रियान आणि राहिल गणेशाची ही सुंदर मूर्ती बनविताना दिसत आहे
गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ला गणरायाचे त्याच्या लाडक्या भक्ताच्या घरी दणक्यात स्वागत झाले. अनेकांनी गणेश मूर्ती विकत आणून तर काहींनी घरातच शाडूच्या मातीची मूर्ती बनवून विराजमान केली. गेल्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली (Eco Friendly) ही संकल्पना जोर धरू लागली आहे. यात सेलिब्रिटींनी तर पुढाकार घेतलाच आहे पण त्याचबरोबर त्यांच्या मुलांनीही या गोष्टीला स्विकारले आहे. त्यामुळे की काय यंदा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याची मुले रियान (Riaan) आणि राहिलने (Rahyl) कागदाच्या बोळ्यापासून सुरेख अशी इको प्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती घडविली आहे. हा व्हिडिओ सध्या सेशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रितेश देशमुखने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेशची मुले रियान आणि राहिल गणेशाची ही सुंदर मूर्ती बनविताना दिसत आहे. Happy Birthday Genelia D'Souza: रितेश देशमुख याने पत्नी जेनेलिया डिसूजा ला सोशल मिडियावर हटक्या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाचा पोस्ट
या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाली असून या दोघांवर नेटक-यांनी कोतुकाचा वर्षाव केला आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया सोशल मिडियावर बरीच सक्रिय असतात. या दोघांचे क्यूट आणि रोमँटिक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होतात. ही जोडी बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे.