Riteish Deshmukh ने मुलगा Rahyl ला वाढदिवसानिमित्त हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा, बापलेकाच्या या व्हिडिओला मिळाले 5 लाखांहून अधिक व्ह्यूज

रितेश या व्हिडिओमध्ये राहिलला मिठी मारून छान गाणं गुणगुणताना दिसत आहे.

Rahyl Deshmukh Birthday Video (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा मुलगा राहिल (Rahyl) याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मिडियाद्वारे बाप-लेकांचा एक क्युट व्हिडिओ शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला. या व्हिडिओमध्ये रितेश आणि राहिलमधील घट्ट नाते पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये राहिल रितेशच्या छातीला बिलगून झोपला आहे आणि दोघेही 'जाने तू या जाने ना' हे गाणे गुणगुणत आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश बेडवर झोपला असून त्याच्या छातीवर राहिल झोपला आहे. रितेश या व्हिडिओमध्ये राहिलला मिठी मारून छान गाणं गुणगुणताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Vilasrao Deshmukh 76th Jayanti: विलासराव देशमुखांच्या आठवणीमध्ये Riteish Deshmukh, Genelia D'souza यांनी शेअर केले भावूक क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आपल्या क्युट आणि मजेशीर व्हिडिओजनी ते चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. तसेच त्यांच्यातील पती-पत्नीपेक्षा दृढ असलेल्या मैत्रीच्या नात्याची झलक देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्यांचे व्हिडिओज सोशल मिडियावर देखील खूप व्हायरल होत असतात. नुकताच रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने रोज सकाळी उशिरा उठवल्यावर काय खायला मिळते याबाबत मजेशीररित्या सांगितले होते.