बॉलिवूडमधील मराठमोळी जोडी रितेश-जेनेलिया देशमुख यांच्या पहिल्या चित्रपटाला झाली 17 वर्ष पूर्ण; शेअर केला रोमँटिक TikTok व्हिडिओ
या व्हिडिओ रितेश-जेनेलियाचा रोमँटिक आणि क्युट अंदाज चाहते पसंत करत आहेत.
बॉलिवूडमधील मराठमोळी गोड जोडी म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). या जोडीचे प्रेक्षकांप्रमाणे बॉलिवूडमध्येही असंख्य चाहते आहेत. ही जोडी ज्या चित्रपटामुळे प्रथम एकत्र आली आणि याच चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र कुणाला ठाऊक होतं की हीच जोडी पुढे जाऊन विवाहबंधनात अडकली जाईल. या चित्रपटाचे नाव होते 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam) या चित्रपटाला 17 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटाची आठवण म्हणून या जोडीने चित्रपटाच्या शीर्षकगीतावर TikTok व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून असंख्य लोक या व्हिडिओला पसंत करत आहेत.
हा व्हिडिओ रितेश देशमुखच्या मूळ गावी बाभळगाव येथे बनविण्यात आला आहे. या व्हिडिओ रितेश-जेनेलियाचा रोमँटिक आणि क्युट अंदाज चाहते पसंत करत आहेत.
@riteishd17 Years Of #tujhemerikasam @geneliad - use the song -make your own videos♬ original sound - riteishd
हेदेखील वाचा- मुलांसह रितेश देशमुख घालतोय 'बाला बाला' या गाण्यावर धिंगाणा, पाहा संपूर्ण व्हिडिओ
ह्या दोघांची लव्हस्टोरी ज्या चित्रपटाच्या सेटवर खुलली त्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाला 3 जानेवारीला 17 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे दोघांनी मिळून खास व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टावरून पोस्ट केले.
@riteishd#tujhemerikasam #palpalsochmeinanana @geneliad reliving 17 yrs of TMK - make your own videos
हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
रितेश आणि जेनेलिया सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात. ही गोड जोडी बॉलिवूड पार्ट्यांपासून थोडी दूरच असली तरी अॅवॉर्ड सोहळ्यात अनेकदा दिसते. जेनेलियाचा चुलबुली अंदाज आणि रितेशचा खट्याळपणा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो.