29 एप्रिल रोजी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यानंतर आज ऋषि कपूर यांच्या निधनाचे वृत्त संपूर्ण कलाविश्वासाठी मोठा धक्का आहे. बॉलिवूडने पाठोपाठ आपले दोन दमदार कलाकार गमावले आहेत.
Rishi Kapoor Passes Away: ऋषि कपूर यांच्या निधनाचे दुःख सहन करणे खूप कठीण; गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला शोक
मुंबईतील Reliance Foundation Hospital मध्ये त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यावर गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.
बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ऋषि कपूर यांचे आज सकाळी मुंबईमध्ये निधन झाले. मुंबईतील Reliance Foundation Hospital मध्ये त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऋषि कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. बॉलिवूड कलावंत, चाहते हळहळले असून ऋषि कपूर यांना सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यातच गानकोकिळा लता मंगेशकर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून हे दुःख सहन करणे खूप कठीण असल्याचे म्हटले आहे.
लता मंगेशकर यांनी ट्विट करत म्हटले की, "काय बोलू? काय लिहू काय समजत नाही. ऋषिजी यांच्या निधनाने मला खूप दुःख होत आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे दुःख सहन करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. परमेश्वर त्यांच्या आत्मास शांती प्रदान करो." (ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूड हळहळले; प्रियंका चोप्रा, रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अर्पण केली आदरांजली)