Lockdown काळात दारूची दुकाने सुरु ठेवा! या मागणीच्या ट्विट मुळे ऋषी कपूर वादाच्या भोवऱ्यात

यानंतर साहिजच ऋषी कपूर हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसून येत आहेत.

Rishi Kapoor (Photo Credit: Instagram)

राज्यभरात लॉक डाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, ऑफिस, मॉल, शाळा, महाविद्यालये सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. राज्यात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊनचे आदेश देण्यात आल्यामुळे येत्या दिवसात सुद्धा या सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत, मात्र अशा परिस्थितीतही राज्यातील परवाना प्राप्त  दारूची दुकाने सुरु ठेवली जावीत अशी मागणी सध्या समोर येत आहे. आश्चर्य म्हणजे ही मागणी स्वतः प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी केली आहे. या परिस्थितीत लोकांमध्ये नैराश्य पाहायला मिळतंय, त्यामुळे दारूची मागणी वाढतेय, सरकारने दुकाने बंद ठेवली असली तरी, काळ्या बाजारात, चोरून दारुची विक्री सुरूच आहे' त्यामुळे अधिकृत रित्या ही दुकाने सुरु ठेवली जावीत अशा आशयाचे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे. यानंतर साहिजच ऋषी कपूर हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसून येत आहेत.(जॉनी लीवर ने आपल्या विनोदी अंदाजात नागरिकांना दिला घरी राहण्याचा सल्ला, पोट धरून हसायला लावणारा व्हिडिओ पाहा)

ऋषी कपूर यांनी दोन ट्विट केले आहेत, यापैकी पहिल्या ट्विट मध्ये त्यांनी दारूची दुकानं सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.'सरकारनं निदान संध्याकाळच्या वेळी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. घरात बसलेली लोकं प्रचंड नैराश्यात आहेत. त्यांच्या आजुबाजूला अनिश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर, आणि नागरिकांवरचा ताण कमी करायचा आहे. तसंही काळ्या बाजारात, चोरून दारुची विक्री सुरूच आहे' असं ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्विट मध्ये ऋषी कपूर यांनी . 'सरकारला तसाही उत्पादन शुल्काचा पैसा हवा आहे. डिप्रेशनमध्ये आणिखी फ्रस्ट्रेशन नको यायला. लोकं अशीही पितच आहेत. त्याला कायदेशीर करून टाकायला हरकत नाही', असं म्हंटल आहे.

ऋषी कपूर ट्विट

दरम्यान, या ट्विट वर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत त्यांचे समर्थन केले आहे तर काहींनी त्यांना परिस्थीतीचे गांभीर्य तरी लक्षात घ्या असे सुनावले आहे. जिथे कोरोनामुळे घरी एकट्या अडकलेल्यांना खायला मिळत नाहीये तिथे तुम्हाला दारूची चिंता आहे का असेही काही जण सवाल करताना दिसत आहेत. सध्या राज्यात ऑनलाईन फूड डिलिव्हरीला मान्यता देण्यात आली आहे मात्र अद्याप दारू च्या दुकानांच्या बाबत कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif