Rhea Chakraborty to Resume Work: रिया चक्रवर्ती 2021 मध्ये करू शकते बॉलिवूडमध्ये पुनरागमन; दिग्दर्शक Rumi Jaffrey ने दिली माहिती

रिया चक्रवर्तीवर सुशांतसिंह राजपूतच्या कुटूंबाच्या वतीने अभिनेत्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यासोबतच सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोपही रियावर होता

Rhea Chakraborty | (Photo Credits: Facebook)

2020 मध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बरीच चर्चेत होती. सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूच्या खटल्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला मुंबईतील भायखळा तुरूंगात महिना घालवावा लागला होता. अशा परिस्थितीत रिया चक्रवर्ती यावर्षी चित्रपटापासून दूर राहिली. पण सन 2021 मध्ये रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परत येऊ शकते. दिग्दर्शक रूमी जाफरी (Rumi Jaffrey) यांनी ही माहिती दिली आहे. रुमी जाफरी हा रिया चक्रवर्तीचा खास मित्र आहे. रूमीने नुकतीच रियाची भेट घेतली. त्याबाबत स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत रुमी जाफरीने सांगितले की, 2021 मध्ये ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करू शकते.

रिया चक्रवर्तीविषयी बोलताना रुमी जाफरी म्हणाला, '2020 हे वर्ष सर्वांसाठीच वाईट होते, पण रिया चक्रवर्तीसाठी ते खूपच धडकी भरवणारे होते. रियाच्या बाबतीत झालेला आघात हा पुढच्या स्तरावरील होता. एका चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला एक महिना तुरूंगात घालवावा लागतो, हे ऐकणेच कठीण आहे. हा अनुभव कसा असेल याची कल्पनाही करू शकत नाही. या गोष्टीने रियाला हादरवून टाकले आहे, पण पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात ती पुन्हा काम सुरु करू शकेल. नुकतेच मी रिया चक्रवर्तीला भेटलो आहे. त्यावेळी ती शांत होती आणि ती ज्या अनुभवामधून गेली आहे त्याबाबत मी तिला काही दोष देऊ शकत नाही. परिस्थिती ठीक होताच रियाकडे बरेच काही सांगायला आहे.'

यासोबतच आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाफरी याने हे स्पष्ट केले आहे की तो रियाच्या जीवनावर चित्रपट बनवत नाही. रियाबद्दल काही अहवाल समोर आले होते ज्यामध्ये म्हटले होते की रिया लवकरच कामावर परत येईल व जाफरी तिच्यावर चित्रपट बनवत आहे. मात्र हे खोटे असल्याचे जाफरीने सांगितले. (हेही वाचा: ललित प्रभाकर चा 'टर्री' सिनेमात नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला!)

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीबाबत अनेक प्रश्न केले जात होते. रिया चक्रवर्तीवर सुशांतसिंह राजपूतच्या कुटूंबाच्या वतीने अभिनेत्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यासोबतच सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोपही रियावर होता. रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग प्रकरणात अटक केली होती.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप