Bharti Singh च्या ड्रग्ज प्रकरणावर Rakhi Sawant चा हल्लाबोल, म्हणाली 'मंत्र्यांची मुले का पकडली जात नाही'
केवळ कलाकारच ड्रग्ज घेतात का?' असा सवाल तिने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय महिला कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांचे ड्रग्ज प्रकरण अलीकडे चांगलेच गाजले. या दोघांनाही प्रकरणात जामिन मंजूर झाला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र या प्रकरणावर बॉलिवूडमधील अनेकांना टिका-टिप्पणी द्यायला सुरुवात केली. त्यात बॉलिवूडची Controversy Queen राखी सावंत (Rakhi Sawant) हिने देखील भारती सिंह हिच्या ड्रग्ज प्रकरणावर वक्तव्य मंत्र्यांच्या मुलांवर निशाणा साधला आहे. 'ड्रग्ज प्रकरणात मंत्र्यांची मुले का पकडली जात नाही. केवळ कलाकारच ड्रग्ज घेतात का?' असा सवाल तिने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
Viralbhyani ने या संदर्भातील राखीचा शेअर केलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात राखीने सांगितले आहे की, "सध्या जे काही सुरु आहे, अनेकांच्या घरी अचानक छापा घातला जातो आणि तेथे ड्रग्ज मिळतात याची कोणी टीप देत आहे का? या संदर्भात कोणी फोन करुन माहिती देत आहे का? मला याबाबत काहीही माहिती नाही. मला फक्त इतकच हवं आहे नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? संपूर्ण देशात ड्रग्ज केवळ कलाकारच घेतात का? दुसरे का पकडले जात नाहीत?" असा सवाल तिने केला आहे.हेदेखील वाचा- Bharti Singh नंतर Drugs Case मध्ये Kapil Sharma सुद्धा अटक होणार असल्याचे म्हणत युजर्सने केले Troll, कॉमेडियनने दिले 'हे' प्रतिउत्तर
त्याचबरोबर तिचा मुळात या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की भारतीसोबत असे काही घडू शकते. "ती एक भारतातील लोकप्रिय कॉमेडियन आहे. मी जेव्हा भारतीला अटक झाल्याची बातमी ऐकली तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत. मला असे वाटते हे कोणाचे तरी षडयंत्र आहे. कोणी तरी त्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले आणि फोन केला आहे" असा राखी स्टाईल विधान तिने केले आहे.