CAA आणि NRC अंतर्गत नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे नसलेल्यांसाठी राखी सावंत ने सुचवला 'हा' पर्याय; पहा व्हिडिओ
आता मात्र तिने केलेल्या नव्या पोस्टमध्ये, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ज्यांना कागदपत्रे सादर करता येत नाहीत त्यांच्यासाठी राखीने एक तोडगा काढला आहे.
CAA आणि नरक संभंधित चर्चांना दिवसेंदिवस उधाण येताना दिसत आहे. हे वादग्रस्त विधेयक पास झाल्यानंतर त्याचे असलेले फायदे तसेच त्याने होणारे नुकसान या सर्वच गोष्टींचे मूल्यांकन करण्यासाठी या चर्चा रंगात आहेत. आपण भारतीय आहोत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची काय आवश्यकता आहे असा अनेकांचा मुद्दा आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील CAA आणि NRC कायद्यावर आपले मत मांडले आहे. आणि विशेष म्हणजे नुकतेच बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने देखील या मुद्द्यावर भाष्य करत आपलं मत मांडलं आहे.
सोशल मीडियावर बोल्ड किंवा फनी व्हिडिओ शेअर करण्यासाठी राखी सावंत नेहमीच आघाडीवर असते. आता मात्र तिने केलेल्या नव्या पोस्टमध्ये, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ज्यांना कागदपत्रे सादर करता येत नाहीत त्यांच्यासाठी राखीने एक तोडगा काढला आहे.
राखीचे असे मत आहे की ज्या लोकांना कागदपत्र नसल्यामुळे त्यांचे नागरिकत्व काढून टाकले जाईल अशी भीती वाटत आहे अशा लोकांनी बँकांकडून मोबदला घ्यावा. त्यानंतर ती म्हणते की बँक आपण भारताचे नागरिक असल्याचे सिद्ध करेल अर्थातच त्यांना कर्ज वसूल करावे लागेल. पहा राखीचा हा व्हिडिओ
View this post on Instagram
Jaao lone lelo daro Matt NRC se🤪
A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on
Rakhi Sawant हिच्या नवऱ्याची पहिली मुलाखत; पहा काय म्हणाला राखीच्या बोल्ड सीन देण्याबद्दल
आता राखीला कोण सांगणार की हे इतकं सहज शक्य नाही. दरम्यान, राखी काही महिन्यांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने एका एनआरआयशी लग्न केले आहे असं तिने सांगितलं होतं. परंतु, तिच्या नवऱ्याला मात्र कोणीही आजवर पाहिलं नाही.