Rakhi Sawant Emotional Video: राखी सावंत हिने प्रसारमाध्यमांसमोर फोडला हंबरडा; आईच्या निधनाचे दु:ख अनावर (पाहा व्हिडिओ)
आईच्या दुख:त तिने कॅमेऱ्यासमोर फोडलेला हंबरडा प्रसारमाध्यमांनी चित्रीत केला. राखीच्या या भावनांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Rakhi Sawant Viral Video) झाले आहेत.
अभीनेत्री, मॉडेल, सोशल मीडिया स्टार राखी सावंत (Rakhi Sawant) हिला मातृशोक (Rakhi Sawant Mother Passed Away) झाला आहे. आईच्या निधनानंतर राखी सावंत (Rakhi Sawant Emotional Video) धाय मोकलून रडतान दिसली. आईच्या दुख:त तिने कॅमेऱ्यासमोर फोडलेला हंबरडा प्रसारमाध्यमांनी चित्रीत केला. राखीच्या या भावनांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Rakhi Sawant Viral Video) झाले आहेत. दरम्यान, मुंबई येथे आईचे पार्थीव अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना राखीसोबत (Rakhi Sawant Reaction) विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
राखी सावंत हिला आईच्या निधनाबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले तेव्हा राखीला आपले दु:ख लपवता आले नाही. तीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत कॅमेऱ्यासमोर ती धाय मोकलून रडू लागली. "मा अब नहीं राही..." असे म्हणत रडणाऱ्या राखीला. तिच्या आप्तेषांनी सावरण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, राखी सावंतच्या आईचे निधन, दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने होत्या त्रस्त)
प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर रडताना राखी सावंत हिला तिच्या एका मैत्रिणीने भावनिक आधार दिला आणि तिचे सांत्वन केले. दरम्यान, कॅमेऱ्यासमोर दु:ख व्यक्त करताना राखी सावंत तिच्या पतीलाही शोधताना आढळली. तिने मैत्रिणीला विचारले की, "आदिल कहाँ है? आदिल को फोन करो."
राखी सावंत हिने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिच्या आईच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राखी सावंत हिची आई जया भेडा यांना ब्रेन ट्यूमर आणि कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर जुहू येथील क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राखी सावंत हिच्यासाठी आई हा एक अतिशय भावनिक विषय होता. ती नेहमीच तिच्या आईचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात तिच्या चाहत्यांना आणि मित्रांना तिच्या आईच्या ढासळत्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते.
राखी सावंत हिचा भावनिक व्हिडिओ
दरम्यान, 'बिग बॉस'मध्ये असतानाही राखीने खुलासा केला की ती तिच्या आईचा वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी ती हा शो करत आहे. 2021 मध्ये तिचा खुलासा झाल्यानंतर, सलमान खानचा भाऊ सोहेल खान यानेही तिला हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे वृत्त पुढे आले होते.