Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; AIIMS च्या संचालकांनी दिली मोठी अपडेट
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे.
Raju Srivastav Health Update: आपल्या विनोदी शैलीने लोकांना हसवणारे राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) जीवनाची लढाई लढत आहेत. राजू श्रीवास्तव हे अनेक दिवसांपासून एम्समध्ये दाखल आहेत. राजू श्रीवास्तव यांच्यावर डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आता राजूच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे. राजूची प्रकृती चिंताजनक असून ते आयसीयूमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही रुग्णाची आणि त्याच्या कुटुंबाची वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे या प्रकरणी काहीही भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी कळताच कॉमेडियनचे सर्व चाहते हतबल झाले आहेत. वास्तविक, राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. (हेही वाचा - Bigg Boss 16 साठी Salman Khan ने मागितले एक हजार कोटी फी, निर्माते करु शकतात रोहित Rohit Shetty ची निवड?)
राजूच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कॉमेडियनच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र आता पुन्हा राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीने चाहत्यांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. राजू लवकर बरा व्हावा यासाठी देशभरातील लोक प्रार्थना करत आहेत. राजूच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी पूजाही ठेवली होती.
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.