Producer Director Johnny Bakshi Passes Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शन जॉन बख्शी यांचे निधन

त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. कुणाल कोहलीने जॉनी यांच्या निधनाची बातमी ऐकून आपण फार दु:खी झाल्याचे सांगितले आहे

Johny Bakshi (Photo Credits: Twitter)

संपूर्ण देशासह बॉलिवूडसाठी 2020 हे खूपच वाईट ठरले याची प्रचिती एव्हाना सर्वांना आलीच असेल. लॉकडाऊन, कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूडची रखडलेली गाडी आता हळूहळी पूर्वपदावर येत आहे. मात्र गेले 4 महिने बंद पडलेले शूटिंग सुरु होण्यास थोडासा वेळ लागेल. अशातच बॉलिवूडमधील सुशांत सिंह राजपूत, ऋषि कपूर, इरफान खान, सरोज खान सारख्या अनेक दिग्गजांना शेवटचा निरोप दिला. त्यातच आता बॉलिवूडचे आणखी एक प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक जॉनी बख्शी (Johnny Bakshi) यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले.

दिग्दर्शक कुणाल कोहली याने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. कुणाल कोहलीने जॉनी यांच्या निधनाची बातमी ऐकून आपण फार दु:खी झाल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर नेहमी मदतीस धावून येणारे, हसरे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते असेही कुणाल कोहलीने माहिती दिली. Rishi Kapoor Funeral: अभिनेते ऋषी कपूर पंचतत्वात विलीन; सैफ अली खान, करीना कपूरसह अनेकांनी उपस्थित राहून रणबीर कपूर, नीतू सिंह यांना दिला मानसिक आधार

जॉनी बख्शी यांनी राजेश खन्ना आणि गुलशन ग्रोवर स्टारर 'खुदाई' चित्रपटाचे निर्माते त्यासोबत दिग्दर्शन सुद्धा केले होते. त्याचबरोबर 'फिर तेरी कहानी याद आई', पंख, मेरा दोस्त मेरा दुश्मन सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif