Priyanka Chopra चे पुस्तक 'Unfinished' ठरले अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट Best Seller, अभिनेत्री सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आनंद

यामुळे ते नंबर 1 वर गेले आहे. आशा आहे तुम्हाला हे पुस्तक आवडेल.'

Priyanka Chopra (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:च्या अभिनयाच्या छाप सोडणारी अभिनेत्री प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) हिचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. त्याला कारणही तितकेच खास आहे. तशी प्रियंका हॉलिवूड स्टार निक जोनास शी लग्न केल्यानंतर तिची लोकप्रियता देश-विदेशापर्यंत पोहोचली होती. त्यात आता तिच्या 'Unfinished' या पुस्तकाने एक नवा विक्रम केला आहे आणि तो ही अमेरिकेत (US). प्रियंकाचे हे पुस्तक मागील 12 तासांत अमेरिकेत सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक बनले आहे. यामुळे हे अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट विक्री झालेले पुस्तक बनले आहे. प्रियंका या गोष्टीने फार आनंदून गेली असून तिने हा आनंद सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

प्रियंकाने ट्विटरवर टॉप 10 पुस्तकांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत 'मी सर्वांचे आभार मानते ज्यांनी माझे पुस्तक मागील 12 तासांत अमेरिकेत सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांच्या यादीत नेऊन ठेवले आहे. यामुळे ते नंबर 1 वर गेले आहे. आशा आहे तुम्हाला हे पुस्तक आवडेल.' World's Most Admired Men and Women: जगातील सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीमध्ये बॉलिवूडमधील Amitabh Bachchan, Shahrukh Khan, Priyanka Chopra, Deepika Padukone यांचा समावेश, जाणून घ्या संपूर्ण यादी

प्रियंकाच्या या भव्य यशाबद्दल तिच्या चाहत्यांना खबर लागताच देश विदेशातील तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रियंकाने दिलेल्या माहितीनुसार, तिने या पुस्तकाचे नाव खूप आधीच ठरवले होते. ती 20 वर्षांपासून एक सार्वजनिक व्यक्ती आहे. त्यामुळे तिने आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनला जीवनाविषयी या पुस्तकात लिहिले आहे.

प्रियंकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती शेवटची 'स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसली होती. यात ती फरहान अख्तर, जायरा वसीमसह मुख्य भूमिकेत दिसली होती.