Priyanka Chopra व्हिडिओ शेअर करत आपल्या सोशल मिडियावरील असंख्य चाहत्यांना भारताला मदत करण्याचे केले आवाहन, दिली 'ही' महत्त्वाची माहिती

भारतातील वाढत्या करोनाच्या स्थितीवर तिने दु:ख व्यक्त केलंय. सोशल मीडियावरून ती मदतीचं आवाहन करतेय.

प्रियंका चोपडा (Photo Credits : Instagram)

देशात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट वेगाने आली आहे. यामुळे यात दिवसागणिक वाढणा-या कोरोना रुग्णांसह मृतांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देश या कोरोनाशी ताकदीनिशी दोन हात करत आहे. दरम्यान अनेक राज्यांत कोरोना लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांना घेऊन अनेक समस्या जाणवत आहेत. अनेक ठिकाणी या गोष्टींचा तुटवडा असल्याने नागरिकांचा नाहक बळी जात आहे. अशा परिस्थितीत आपल्या भारत देशाच्या पाठीशी उभी राहिलीय बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)... तिने आपल्या सोशल अकाउंटवरून आपल्या भारत देशाला मदत करावी असे आवाहन आपल्या जगभरातील असंख्य चाहत्यांना केले आहे.

प्रियंका चोपड़ा ही सध्या लंडनमध्ये असली तरी ती सोशल मीडियावरून देशातील घडामोडींवर तिचं मत मांडत आहे. भारतातील वाढत्या करोनाच्या स्थितीवर तिने दु:ख व्यक्त केलंय. सोशल मीडियावरून ती मदतीचं आवाहन करतेय.हेदेखील वाचा- COVID 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता Ayushmann Khurranaची महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत; मानवजातीवरील संकट दूर करण्यासाठी एकत्र येण्याची बोलून दाखवली गरज

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

"भारत माझा देश, माझं घरं आहे. सध्या तो करोनाच्या संकटाशी लढतोय. आपल्या सर्वांची देशाला गरज आहे. रुग्णांची संख्या वाढतेय, मृतांचा आकडादेखईल वाढतोय. त्यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे." असे आवाहन तिने केलय. पुढे ती म्हणाली, “मदतीसाठी मी गिव्हइंडियासोबत एकत्र येत एका संस्थेची स्थापना केली आहे. तुम्ही यात तुमचं योगदान देऊ शकता, यामुळे बराच फरक पडेल. मला 63 मिनियन लोक फॉल करतात. प्रत्येकाने 10 डॉलर दिले तरी मोठी रक्कम जमा होईल. ही रक्कम थेट आरोग्य सुविधेसाठी दिली जाईल.” अशी माहिती तिने या पोस्टमध्ये दिली आहे. शिवाय तिने अनेकांना कृपया ‘मदत’ करा असं आवाहन केलं आहे.

"मी आणि निक शक्य ती मदत करत आहोत" असं ती म्हणाली. काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना टॅग करत एक ट्विट केलं होतं. यात तिने आभार मानत भारत देशाला कोरोनावरील लस कधी पाठवणार आहात ? असा सवाल देखील केला होता.