Priyanka Chopra पहिल्यांदाच लेक Malti Marie सह भारतात दाखल; Parineeti Chopra-Raghav Chadha यांच्या लग्नासाठी 'देसी गर्ल' सह कुटुंब मायदेशी? (Watch Videos)
प्रियंकाच्या लेकीची ही भारताची पहिलीच ट्रीप आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल Priyanka Chopra पती Nick Jonas आणि लेक Malti Marie सह भारतामध्ये दाखल झाली आहे. प्रियंकाची मुलगी Malti Marie हीची भारतामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. एअरपोर्ट वर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान परिणिती चोपडा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या अफवांदरम्यान प्रियंकांचं भारतामध्ये सहकुटुंब दाखल होणं हा निव्वळ योगायोग आहे की खरंच परिणीती बोहल्यावर चढणार याची चर्चा आता अजून रंगायला लागली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, Nita Mukesh Ambani Cultural Centre च्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रियंका पती सह भारतामध्ये दाखल झालेली आहे. आज 31 मार्चला Nita Mukesh Ambani Cultural Centre चा भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. हॉलिवूड कलाकार Zendaya आणि Tom Holland देखील मुंबई एअरपोर्ट वर दिसले आहेत.
Priyanka Chopra पती आणि लेकीसह
Jonas Brothers' Hollywood Walk of Fame ceremony च्या कार्यक्रमामध्ये प्रियंका चोप्राच्या लेकीची पहिली झलक दिसली होती. 30 जानेवारी 2023 ला झालेल्या या सोहळ्यात Malti Marie प्रियंकाच्या मांडीवर बसली होती. जानेवारी 2022 मध्ये जन्मलेली Malti Marie ही सरोगसी द्वारा त्यांच्या आयुष्यात आली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून आप चे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या वाढत्या गाठीभेटींमुळे ते लवकरच विवाहबंधनात अडकणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. परिणिती चोपडा आणि प्रियंका चोपडा या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे प्रियंका च्या या भारतभेटीमध्ये परिणीतीचं शुभामंगल आटोपलं जाणार का? याची देखील आता चर्चा सोशल मीडीयामध्ये रंगत आहे. राघव चढ्ढा आणि परिणिती यांच्याकडून त्यांच्या या लग्नाच्या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दोघेही हे प्रश्न टाळत केवळ हसून पुढे जात असल्याने आता या चर्चा अधिकच रंगवल्या जात आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)