कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अनेकजण आपल्या परिने मदत करत लढ्यात खारीचा वाटा उचलत आहेत. देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने देखील पुढाकार घेत प्रधानमंत्री सहाय्यता निधीत (PM CARES Fund) काही रक्कम दान केली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), वरुण धवन (Varun Dhawan), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांच्यानंतर आता प्रियंकानेही कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी एक पाऊल पुढे येत आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर प्रियंका चोप्रा आणि पती निक जोनस या दोघांनी मिळून युनिसेफ, Aseema यांसारख्या संस्थांना सढळ हस्ते मदत केली आहे. (प्रियंका चोप्रा हिने पूर्ण केले Safe Hand Challenge; व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन, निक जोनस सह परिणीति चोप्रा हिला केले नॉमिनेट)
याची माहिती प्रियंकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. पोस्टमध्ये प्रियंकाने लिहिले की, "कधी नव्हे ती आता जगाला आपली खूप गरज आहे. या संस्था कोरोना व्हायरस बाधितांना मदत करतात. तसंच गरजूंना अन्नदान, निवारा याची सोय करतात." तसंच निक आणि तिने ज्या विविध संस्थांना दान दिले आहे, याची माहितीही तिने पोस्टद्वारे दिली.
या संस्थांना तुमच्याही मदतीची गरज आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही दान करा. कोणतेच दान छोटे नसते. त्यामुळे आपण एकत्रितपणे कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करु शकू, असा संदेशही तिने चाहत्यांना दिला आहे.