Prathamesh- Kshitija Wedding: थाटा माटात पार पडला प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत होती. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prathamesh- Kshitija Wedding: थाटा माटात पार पडला प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आहे. विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या प्रथमेश आणि क्षितिजा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या विवाह सोहळ्याला रवी जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी हजेरी लावली होती.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत होती. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,"Finally......Lockdown love story चे Hearts, forever साठी locked" प्रथमेश आणि क्षितिजा यांनी शेअर केलेल्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेश परबला टाईमपास या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यानं दगडू परब ही भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. प्रथमेशचा डिलिव्हरी बॉय हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मोहसीन खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बालक-पालक,उर्फी,लालबागची राणी, टकाटक 2 या चित्रपटांमध्ये प्रथमेशनं काम केलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2024 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).