Popular Web Series to Release in 2021: The Family Man च्या Season 2 पासून Aarya 2 पर्यंत यंदा प्रदर्शित होतील 'या' लोकप्रिय वेब सिरीज

नुकताच एमी पुरस्कार जिंकल्यानंतर दिल्ली क्राइमच्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्सवर दुसर्‍या सिझनची तयारी केली आहे. नव्या सिरीजमध्ये एक वेगळी कहाणी दाखवली जाणार आहे, जी नवीन पात्रांवर आधारित असेल. शेफाली शाह, राजेश तैलंग, रसिका दुगल आणि आदिल हुसेन अभिनीत, या वेब सीरिजच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या पहिला सिझनचे खूप कौतुक झाले होते

Web Series to Release in 2021 (Photo Credits: Instagram)

एकीकडे 2020 हे साल कोरोना विषाणूने गाजवले, तर दुसरीकडे मागच्या वर्षी घरात अडकून पडलेल्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक उत्तम सिरीज (Web Series) व फिल्म्स प्रदर्शित झाल्या. आता जेव्हा आपण 2021 कडून काही सकारात्मक अपेक्षा बाळगल्या आहेत, तेव्हा आपसूकच भारताच्या ओटीटी कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. 2021 मध्येही ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदा काही नवीन सिरीजसह अनेक उत्तम सिरीजचे पुढचे भाग लोकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे पुन्हा चित्रपटगृहांच्या ऐवजी लोक ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशा काही लोकप्रिय सिरीज ज्यांचे पुढील भाग यंदा आपले मनोरंजन करतील.

द फॅमिली मॅन- सीझन 2 (The Family Man Season 2) –

Amazon Prime वरील 'द फॅमिली मॅन' सिरीजचा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन 14 जानेवारी, 2021 पासून पाहण्यासाठी उपलब्ध आहे. वर्षभरापूर्वी ओटीटी स्पेसवर रिलीज झालेल्या या अ‍ॅक्शन थ्रिलरच्या पहिल्या भागानंतर त्याचा दुसरा सिझन येण्यासाठी बरीच वाट पहावी लागली. मनोज बाजपेयी, प्रियामणि अय्यर, श्रेया धनवंतरी, शरद केळकर आणि जरीन शिहाब यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'द फॅमिली मॅन' चा  सीझन 1 पल्सेटिंग नोटवर समाप्त झाला होता.

ब्रोकन बट ब्युटीफुल सीजन 3 (Broken But Beautiful Season 3) –

अल्ट बालाजीच्या बहुप्रतिक्षित ब्रोकन पण ब्युटीफुल सीझन 3 च्या पूर्वीचे दोन भाग, त्याची कथा आणि स्क्रीनप्लेमुळे सुपरहिट ठरले होते. पहिल्या दोन सिझनमध्ये विक्रांत मेस्सी आणि हर्लीन सेठी मुख्य भूमिकेत दिसले होते. आता तिसऱ्या सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठी मुख्य जोडीची भूमिका साकारतील. 'ब्रोकन बट ब्युटीफुल' ही सिरीज 2018 मध्ये सुरू झाली होती, आता याचा तिसरा सिझन 2021 मध्ये येणार आहे.

आर्या सिझन 2 (Aarya 2) –

सुश्मिता सेनच्या अभिनयाने सजलेल्या या सिरीजचा प्रीमियर 19 जून 2020 रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर झाला होता. अतिशय उत्कंठावर्धक ही सिरीज प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. आता यंदा त्याचा पुढील भाग येणार आहे. दिग्दर्शक राम माधवानी यांनी इंस्टाग्राम लाइव्हमध्ये याची घोषणा केली होती.

दिल्ली क्राईम सिझन 2 (Delhi Crime Season 2) –

नुकताच एमी पुरस्कार जिंकल्यानंतर दिल्ली क्राइमच्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्सवर दुसर्‍या सिझनची तयारी केली आहे. नव्या सिरीजमध्ये एक वेगळी कहाणी दाखवली जाणार आहे, जी नवीन पात्रांवर आधारित असेल. शेफाली शाह, राजेश तैलंग, रसिका दुगल आणि आदिल हुसेन अभिनीत, या वेब सीरिजच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या पहिला सिझनचे खूप कौतुक झाले होते. आता यंदा याचा पुढचा सिझन येणार आहे.

गुल्लक सिझन 2 (Gullak: Season 2) –

गुल्लक सीझन 2 चा प्रीमियर सोनी लिव्हवर वर 15 जानेवारी रोजी झाला आहे. या टीव्हीएफ सिरीजमध्ये गीतांजली कुलकर्णी, जमील खान, हर्ष मैर आणि वैभवराज गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.

अपहरण 2 –

अरुणोदय सिंग आणि निधी सिंग यांच्या अभिनयाने सजलेल्या अपहरणचा दुसरा सिझनही 2021 मध्ये येणार आहे. अरुणोदय रुद्र श्रीवास्तवच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर निधि रंजना श्रीवास्तवच्या भूमिकेत दिसणार आहेत. दुसर्‍या सिझनचे चित्रीकरण उत्तराखंडच्या बर्‍याच भागात सुरू आहे.

यासह प्रेक्षकांना असुर आणि ब्रिदच्या पुढील भागाचीही प्रतीक्षा आहे. लॉकडाऊनच्या ओटीटी व्यासपीठे अतिशय लोकप्रिय ठरली आहे. भारतामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी, सोनी लिव्ह, डिस्ने+ हॉटस्टार अशा अनेकांनी प्रीमियम कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून स्वत: ची स्थापना केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now