Parineeti Chopra Wedding Lehenga: परिणीती चोप्राच्या लग्नाचा लेहेंगा बनवण्यासाठी लागले 2,500 तास; डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा खुलासा
नवविवाहित जोडप्याने त्यांचे फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, वधूचा लेहेंगा डिझाइन करणारे मनीष मल्होत्रा (Designer Manish Malhotra) यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर सुंदर पोशाख तयार करण्यामागील काही खुलासे केले.
Parineeti Chopra Wedding Lehenga: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ने अखेर 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) चे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्याशी विवाह केला. या जोडप्याने सोमवारी त्यांच्या लग्नाचे फोटोज शेअर केले आणि काही मिनिटांतच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. परिणिती आणि राघव यांनी विशेष थीमवर आधारित कपडे परिधान केले होते. या हे कपल खूपचं क्यूट दिसत होते.
परिणीती आणि राघव यांनी उदयपूरमधील पिचोला तलावाच्या मध्यभागी त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या स्वप्नाळू लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "ब्रेकफास्ट टेबलवर पहिल्याच गप्पा झाल्यापासूनचं आमची मनं कळत होती. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. शेवटी मिस्टर आणि मिसेस बनण्याचा आशीर्वाद मिळाला! हे शक्य नव्हतं. एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हतो.. आता आम्ही कायम सोबत राहू." (हेही वाचा -Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos: परिणीति चोपड़ा-राघव चड्ढा यांच्या 'Pearl-White' थीम वर आधारित लग्नसोहळ्यातील खास क्षण आले समोर (View Pics))
नवविवाहित जोडप्याने त्यांचे फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, वधूचा लेहेंगा डिझाइन करणारे मनीष मल्होत्रा (Designer Manish Malhotra) यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर सुंदर पोशाख तयार करण्यामागील काही खुलासे केले. मल्होत्राच्या टीमने उघड केलं की, लेहेंगा तयार करण्यासाठी तब्बल 2,500 तास लागले. हा लेहेंगा पूर्णपणे हाताने भरतकामाने सजलेला होता. नक्षी आणि धातूचे सिक्वीन्स हे अभिजाततेला स्पर्श करतात, नाजूक जाळी #mmblouse आणि tulle फ्रेमवर्क दुपट्ट्याला उत्तम प्रकारे पूरक आहेत, असंही डिझायनरने सांगितले आहे.
परिणीतीने राघवच्या नावाची नक्षी असलेला पदर घेतला होता. मनीश मल्होत्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमच्या सिग्नेचर ट्यूल #MMveil मध्ये देवनागरी लिपीत राघवचे नाव लिहिण्यात आलं आहे, जे कामाच्या कलात्मकतेने त्यांचे खोल प्रेम प्रतिबिंबित करते. मल्होत्रा यांनी परिणीतीच्या वधूच्या पोशाखासोबत असलेल्या दागिन्यांबद्दल विशिष्ट तपशील देखील शेअर केला.
मल्होत्रा यांनी पुढे म्हटलं आहे की, मल्टी-टायर्ड नेकलेस अनकट, झांबिया आणि रशियन पन्ना पासून बनवले गेले होते. डायमंड्स आणि रशियन पन्ना वापरून अचूकपणे डिझाइन केलेले कानातले, मांग टिक्का आणि हातफूल यामुळे नववधूचा लूक अधिक खास दिसत होता.