Parineeti Chopra ने सांगितली Family Planning; आई बनण्यासाठी उचलणार 'हे' मोठे पाऊल

मात्र, चित्रपटाची कामगिरी निराशाजनक ठरली. दरम्यान, पालकत्वाबाबत अभिनेत्रीचे नुकतेच विधान प्रसिद्धीझोतात आले आहे. यामध्ये परिणिती आई बनण्याबाबत खूप काही सांगताना दिसत आहे.

Parineeti Chopra (PC - Instagram)

Parineeti Chopra On Family Planning: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच उदयपूरमध्ये राघव चड्डासोबत लग्न केले. त्याचवेळी परिणीतीचा बहुप्रतिक्षित 'मिशन राणीगंज' हा चित्रपटही थिएटरमध्ये दाखल झाला आहे. मात्र, चित्रपटाची कामगिरी निराशाजनक ठरली. दरम्यान, पालकत्वाबाबत (Family Planning) अभिनेत्रीचे नुकतेच विधान प्रसिद्धीझोतात आले आहे. यामध्ये परिणिती आई बनण्याबाबत खूप काही सांगताना दिसत आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील नवविवाहित जोडप्यांना पालक बनण्याबद्दल प्रश्न विचारला जातो. असा प्रश्नही परिणीतीला विचारण्यात आला. त्याचवेळी अभिनेत्रीने यावर दिलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत परिणीतीने सांगितले होते की, तिला एक मूल दत्तक घ्यायचे आहे. अभिनेत्रीने तिच्या संभाषणात सांगितले की, त्यांना गर्भधारणा करणे तिच्यासाठी शक्य होणार नाही, म्हणून ती त्यांना दत्तक घेऊ इच्छित आहे. (हेही वाचा - Parineeti Chopra Wedding Lehenga: परिणीती चोप्राच्या लग्नाचा लेहेंगा बनवण्यासाठी लागले 2,500 तास; डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांचा खुलासा)

याबाबत बोलताना परिणिती म्हणाली, मला आशा आहे की राघव आणि माझे याबाबत सारखेच मत आहे. 24 सप्टेंबर रोजी, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा, उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये जवळच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत एका इंटिमेट समारंभात विवाहबद्ध झाले.

परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. परंतु प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या काही दिवसांत परिणीती अमर सिंग चमकीला यांच्या बायोपिकमध्येही दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे.