Photos : फिल्मफेअरच्या कव्हरवर परिणीती चोप्राचा हॉट अंदाज
परिणीती चोप्रा (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या नमस्ते इंग्लंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात तिच्यासोबत अर्जुन कपूर प्रमुख भूमिकेत आहे. पण सध्या परिणीती तिच्या बिकिनी लूकमुळे चर्चेत आली आहे. तिने हे फोटोशूट फिल्मफेअर मॅगझीनसाठी केले आहे.

फिल्मफेअरच्या ऑक्टोबर एडिशनवर परिणीतीचा हा हॉट लूक पाहायला मिळणार आहे. परिणीतीच्या या हॉट लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. फिल्मफेअरने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पाहा परिणीतीचा हा हॉट अंदाज...

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

‪Water baby! ‬ ‪Here’s another stunning picture of @parineetichopra from our latest cover shoot. More pictures to be out soon. ‬

A post shared by Filmfare (@filmfare) on

 

 

नमस्ते इंग्लंड या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केले आहे. पेन फिल्म आणि रिलायन्स इंटरटेनमेंट हा सिनेमा प्रस्तुत करणार आहे. 19 ऑक्टोबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

नमस्ते इंग्लंड नंतर परिणीती 'संदीप और पिंकी फरार', 'केसरी' या सिनेमातही झळकणार आहे. 'केसरी' सिनेमात ती अक्षय कुमारसोबत दिसेल तर 'संदीप और पिंकी फरार' परिणीती पुन्हा एकदा अर्जुन कपूरसोबत स्क्रिन शेअर करेल.