Super 30 'Paisa' Song: तुमच्या बेरंगी दुनियेला रंगीन बनवायला आलयं 'Paisa' साँग, तुम्ही ऐकलं का?

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)चा बहुचर्चित चित्रपट 'सुपर 30' (Super 30) मधील नवीन 'पैसा' (Paisa) गाणे प्रदर्शित झाले आहे.

Hritik Roshan Pic (Photo Credits: YouTube)

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)चा बहुचर्चित चित्रपट 'सुपर 30' (Super 30) मधील नवीन 'पैसा' (Paisa) गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातील ऋतिक रोशन चा लूक आणि ट्रेलर जितके हटके तितकेच हटके हे गाणे देखील आहे. या गाण्यात आनंद कुमार (Anand Kumar) बनलेला ऋतिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मुख्य म्हणजे ह्या गाण्याला संगीत दिलय ते मराठीतील सुप्रसिद्ध अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी.

हे गाणे प्रदर्शित होण्याआधी ऋतिक ने याबाबतची माहिती आपल्या सोशल पेजद्वारे दिली. हे गाणे लिहिले आहे अमिताभ भट्टाचार्य यांनी. तर संगीतकार तसेच गायक म्हणून प्रसिद्ध असलेले विशाल ददलानी (Vishal Dadlani) हे गाणे लिहिले आहे. या गाण्यामध्ये ऋतिकसह पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सुद्धा थिरकताना दिसत आहेत.

याआधी या चित्रपटातील 'जुगराफिया' हे गाणे प्रदर्शित झाले होते. ज्यात ऋतिक आणि मृणाल ठाकुर मध्ये रोमांस दाखवण्यात आला होता. श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा- Super 30 Trailer: 'सुपर 30' सिनेमाचा दमदार ट्रेलर आऊट; बिहारी सुपरहिरोच्या रुपात हृतिक रोशन याने जिंकली प्रेक्षकांची मने

सुपर 30 हा चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला असून, येत्या 12 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल. मात्र त्याचवेळीस कंगना रनौत ची 'मेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने या दोन्ही चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळेल असेच म्हणावे.