Sunil Shetty on Boycott Bollywood: 'बॉलिवुडमध्ये सगळेच ड्रग्ज घेत नाहत'; सुनील शेट्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर व्यक्त केल्या भावना
उत्तर प्रदेशला 'भारतातील सर्वात चित्रपट अनुकूल राज्य' म्हणून प्रसिद्धी देण्यासाठी मुख्यमंत्री दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.
Sunil Shetty on Boycott Bollywood: बॉलिवूड सेलिब्रिटींनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. यात सुनील शेट्टी (Sunil Shetty), सुभाष घई, जॅकी श्रॉफ, सोनू निगम आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक कलाकार होते. नोएडामध्ये बनत असलेल्या फिल्मसिटीसंदर्भात सीएम योगींनी या सेलिब्रिटींसोबत बैठक घेतली. दरम्यान, यावेळी सुनील शेट्टी यांनी सोशल मीडियावर सुरू असलेला बॉलीवूडचा बहिष्कार (#BoycottBollywood) हा ट्रेंड हटवण्याची मागणी केली असून यामुळे आम्हाला खूप त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Boycott Bollywood प्रवृत्ती संपली पाहिजे -
सुनील शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, बॉलीवूडमधील 99 टक्के लोक ड्रग्ज घेत नाहीत. ते लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मेहनत घेतात. अशा प्रकारच्या बहिष्काराच्या प्रवृत्तीमुळे आपले खूप नुकसान होते. त्यामुळे #BoycottBollywood सारखे ट्रेंड काढून टाकणे आवश्यक आहे. (हेही वाचा - Katrina-Vicky Visits Siddhivinayak Temple: कतरिना कैफने पती विकी कौशलसोबत सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट, See Photos)
या भेटीत सुनील शेट्टी यांनी या बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडचा सामना करणाऱ्या चित्रपटांचा उल्लेख केला. अलीकडे देशात शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाविरोधात मोठा विरोध होत आहे. याबाबत अनेक चित्रपटगृहांची तोडफोडही केली जात आहे. बेशरम रंग या गाण्यावर दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घालून अतिशय बोल्ड पोज दिल्याने हा संपूर्ण वाद सुरू झाला. लोकांनी याला धार्मिक भावना दुखावणारे म्हटले आहे.
गेल्या वर्षभरात अनेक चित्रपट बहिष्काराच्या या ट्रेंडला बळी पडले होते, याची आठवण देखील यावेळी सुनील शेट्टी यांनी करून दिली. याचा सर्वाधिक फटका आमिर खान आणि अक्षय कुमार यांना बसला. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटगृहांमध्ये चांगलाच फ्लॉप झाला, तर अक्षय कुमारचे 4 चित्रपट हिट होऊ शकले नाहीत. लिगर आणि 'थँक गॉड'सह अनेक चित्रपटांना या ट्रेंडचा फटका बसला.
मुंबईत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी संवाद साधला. उत्तर प्रदेशला 'भारतातील सर्वात चित्रपट अनुकूल राज्य' म्हणून प्रसिद्धी देण्यासाठी मुख्यमंत्री दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. सुनील शेट्टी व्यतिरिक्त, रवी किशन, जॅकी भगनानी, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव, सोनू निगम यांच्यासह बोनी कपूर आणि सुभाष घई यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली होती.