Nora Fatehi: जगप्रसिध्द फिफा विश्वचषकात अभिनेत्री नोरा फतेहीला एक चुक पडली महागात, सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून नोरा ट्रोल

ही चुक नोराने जाणीवपूर्वक केली नसली तरी नोराला सोशल मिडीयावर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. किंबहुना, करु गेले काय आणि वरती झाले पाय असचं काहीसं म्हणण्याची वेळ नोरावर आली आहे.

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)  ही जगप्रसिध्द फिफा विश्वचषकात परफार्म करणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे. नोराच्या ठुमक्यांची चर्चा आता फक्त भारतातचं नाही तर जगात होत आहे. जगभरात नोराच्या डान्सचे करोडो चाहते आहे ही बाब आता पुढे आली आहे. फिफामधील (FIFA) नोराचा परफॉर्मन्स कायम अविस्मरणीय असेल. पण एवढं काबिले तारीफ नृत्य सादर केल्या नंतर देखील अभिनेत्री नोराला भारतात ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे. फिफा विश्वचषकाच्या मंचावर केलेली एक चुक नोराला चांगलीचं महागात पडली आहे. ही चुक नोराने जाणीवपूर्वक केली नसली तरी नोराला सोशल मिडीयावर (Social Media) भयंकर ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे. किंबहुना, करु गेले काय आणि वरती झाले पाय असचं काहीसं म्हणण्याची वेळ नोरावर आली आहे. कारण चुकुन का होईना नोराकडून थेट भारतीय राष्ट्रध्वजाचा (Indian Flag) अपमान झाला आहे.

 

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) फिफा विश्वचषकाच्या मंचावर परफॉर्म (FIFA Perform) करताना व्यासपिठाच्या अगदी पुढे एक भारतीय फॅन (Indian Fan) उभा होता. त्याच्या हातात भारतचा तिरंगा (Indian Flag) होता. नोराचा परफॉर्मस संपल्यानंतर नोराने तो तिरंगा हातात घेतला आणि जय हिंदची घोषणा दिली. दरम्यान हवेमुळे तिरंगा (Indian Tricolour) उडू लागला. तरी तिरंगा सावरत नोराने तिरंगा उलटा धराला आणि मग काय इंटरनेटवर (Internet) एकचं चर्चा रंगली की नोराने तिरंगा उलटा धरला. सोशल मिडीयावर (Social Media) नोराच्या या व्हिडीओची (Video) जोरदार चर्चा होवू लागली. (हे ही वाचा:- Money Laundering Case: Nora Fatehi ED कार्यालयात दाखल; 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात होणार चौकशी)

 

पण नोराच्या (Nora Fatehi) या व्हायरल (Viral) होणाऱ्या व्हिडीओत (Video) नोरा 'जय हिंद'च्या घोषणा देतांना दिसत आहे. एवढचं नाही तर या व्हिडीओत नोरा म्हणते की भारत (India) फुटबॉल  विश्वचषकात खेळाच्या माध्यमातून सामिल नसला तरी भारत नाच-गाण्याच्या माध्यमातून पुर्ण तकदीसह सहभागी आहे. नोराचा फिफा मधील परफॉर्मस खरचं भन्नाट होता. पण तिच्याकडून नकळत घडलेल्या एका चुकीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.