Kochi Shocker: केरळमध्ये निकिता गांधीच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी

ही घटना उघडकीस आल्यानंतर निकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अधिकृत निवेदन जारी केले आहे.

Nikita Gandhi (PC- Instagram)

Kochi Shocker: केरळमधील (Kerala) कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (कुसॅट) येथे शनिवारी गायिका निकिता गांधी (Nikita Gandhi) यांच्या मैफिलीत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत तब्बल चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 60 जण जखमी झाले. ही घटना कॉलेजच्या वार्षिक टेक फेस्ट दरम्यान घडली. वृत्तानुसार, निकिता गांधी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. मैफिलीतील प्रवेश वैध पासेसपुरते मर्यादित असतानाही, कार्यक्रमस्थळी पाऊस सुरू झाल्याने परिस्थितीने बिकट झाली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सभागृहाच्या बाहेर थांबलेले चाहते आतमध्ये आश्रय घेण्यासाठी धावले आणि तेव्हाच चेंगराचेंगरी होऊन विद्यार्थी खाली कोसळले. ही घटना उघडकीस आल्यानंतर निकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. (हेही वाचा - Carry Minati In Trouble: संदिप माहेश्वरी यांना रोस्टकरुन कॅरी मिनाटी अडचणीत, माफीनामा लिहण्याची मागणी)

 

View this post on Instagram

 

A post shared by N I K H I T A (@nikhitagandhiofficial)

या निवेदनामध्ये निकिता गांधी यांनी म्हटलं आहे की, 'कोचीमध्ये आज संध्याकाळी जे घडले त्यामुळे ह्रदय तुटले. मी कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वीच अशी दुर्दैवी घटना घडली. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना माझ्या प्रार्थना आहेत.