नेहा धूपियाने शेअर केला आपली मुलगी मेहरचा क्यूट व्हिडिओ, इंटरनेटवर झाला व्हायरल; Watch Video

नेहाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिची मुलगी मेहर पावसात छान मस्ती करताना दिसत आहे. नेहाने इन्स्टाग्रामवर मेहरची ही क्यूट क्लिप शेअर केली आहे

नेहा धूपियाने शेअर केला आपली मुलगी मेहरचा क्यूट व्हिडिओ, इंटरनेटवर झाला व्हायरल; Watch Video
Meher (Photo Credits: instagram)

अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) आपली मुलगी मेहर (Meher) सह अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. स्टारकिड्स असलेली मेहर सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. नुकताच नेहाने मेहर चा क्युट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत मेहर रेनकोट घालून पावसाचा छान आनंद घेताना दिसत आहे. आपल्या लाडक्या मुलीची प्रत्येक गोष्ट सोशल मिडियावर शेअर करणा-या नेहाने मेहरला 20 महिने झाल्यानिमित्ताने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नेहाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिची मुलगी मेहर पावसात छान मस्ती करताना दिसत आहे. नेहाने इन्स्टाग्रामवर मेहरची ही क्यूट क्लिप शेअर केली आहे. प्रेग्नन्सी नंतर मिळेना काम; बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया ने व्यक्त केली नाराजी

पाहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Our little storm ⛈... #20monthsold today ❤️ we love you our naughtooooo 😍😍😍 @mehrdhupiabedi

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

या व्हिडिओमध्ये नेहाचा आवाजही ऐकायला येत आहे. ज्यात ती 'रेन रेन गो अवे, कम अगेन अनदर डे' गात आहे. या व्हिडिओला तिने "मेरी नन्हीं तूफान. आज 20 महिने पूर्ण झाले. आम्ही सर्व तिच्यावर प्रचंड प्रेम करतो." नेहाने अंगद बेदीशी लग्न केल्यानंतर काही महिन्यातच तिने आपल्या चाहत्यांना आपण गरोदर असल्याची माहिती सोशल मिडियाद्वारे दिली होती. मेहरचा जन्म 2018 मध्ये झाला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2020 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).