Neena Gupta Gets Trolls: शॉर्ट्स घातल्याने अभिनेत्री नीना गुप्ता झाली ट्रोल, कमेंट्सवर चाहतेही संतापले
या स्क्रिनिंगला नीना गुप्ता ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. पण, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नीनाच्या या ग्लॅमरस लूकवरून तिला ट्रोल केले. स्क्रिनिंगसाठी नीना गुप्ताने व्हाईट कलरचा को-ऑर्डर सेट घातला होता.
प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा कॉमेडी ड्रामा 'पंचायत' चा तिसरा सीझन(Panchayat Season 3 ) प्राइम व्हिडिओवर (Prime Video)आला आहे. त्यामुळे फुलेरा गावात होणारी खळबळ पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता येणार आहे. नीना गुप्ताची भूमिका असलेली पंचायत (Panchayat Web Series) वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पंचायत-3 ची प्रेक्षकांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आज संपली. 'पंचायत-3' (Panchayat Web Series) वेब सीरिजचे नुकतेच स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. (हेही वाचा - Panchayat Season 3 Streaming On Prime: 'पंचायत 3' मध्ये फुलेरा गावात सचिव ची पुन्हा एन्ट्री; ग्रामस्थ, प्रधान, विरोधकांमधील जुगलबंदीने प्रेक्षक पुन्हा खळखळूण हसणार)
या स्क्रिनिंगला नीना गुप्ता ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. पण, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नीनाच्या या ग्लॅमरस लूकवरून तिला ट्रोल केले. स्क्रिनिंगसाठी नीना गुप्ताने व्हाईट कलरचा को-ऑर्डर सेट घातला होता. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. काही नेटकऱ्यांना तिची हा लूक आवडला नाही. त्यांनी नीना गुप्तावर टीका सुरू केली.
View this post on Instagram
नीना गुप्ताला तिच्या वयावरून ट्रोल करणाऱ्यांना एका युजरने म्हटले की, लोक इतकी जळतात का? ती एक आनंदी महिला आहे. एका युजरने म्हटले की, मी जेव्हा एखाद्या महिलेला स्वत:ची काळजी घेताना पाहते तेव्हा मला आनंद वाटतो. लोक काय म्हणतील याची काळजी न करता एखादी महिला पुढे जाते तेव्हा खूप छान वाटते. पंचायत-3 या वेब सीरिजमध्ये नीना गुप्ताशिवाय, जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय आणि फैसल मलिक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2024 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

